Mumbai News – अंधेरीत बेस्ट बसला दुचाकीची धडक, तरुण गंभीर जखमी
अंधेरीतील एमआयडीसी परिसरात बेस्ट बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. साठे चौकात शुक्रवारी सकाळी बेस्ट बसला एक दुचाकी धडकली. या अपघातात 35 वर्षीय दुचाकीस्वार गंभीर झाला आहे. इस्माईल सुरतवाला असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी बस चालक विजय पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेस्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगरकर चौकातून महाकाली गुहाकडे जाणाऱ्या बसला अचानक जवळच्या बायलेनमधून बाहेर पडणाऱ्या दुचाकीने धडक दिली. बसच्या उजव्या साईडच्या मागच्या भागाला धडकल्यानंतर इस्माईल गाडीवरून खाली पडला. यानंतर बसचा मागचा टायर सुरतवाला यांच्या डाव्या हातावरुन गेला. सुरतवाला याला तातडीने अंधेरी येथील होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव जखमीला रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त बस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणली. अपघातप्रकरणी बेस्ट बस चालक विजय पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List