अशी ही सणकी! मांजरीसारखं दिसण्यासाठी खर्च केले 7 लाख; आणि असा परिणाम झाला….
विज्ञानाच्या जोरावर कृत्रिम शस्त्रक्रिया करून आपला संपूर्ण चेहरामोहरा बदलता येतो. आजपर्यंत अशा शस्त्रक्रिया अनेक कलाकारांनी केलेल्या आपण पाहिल्या आहेत. मात्र, या शस्त्रक्रियांचे वाईट परिणाम झालेलाही दिसून येतो. अशीच एक घटना एका इन्फ्लुएन्सरसोबत घडली आहे. या इन्फ्लूएन्सरला मांजरीसारखे दिसण्याची आवड होती. यासाठी अथक प्रयत्नही केले. पण ते फोल ठरले.
मिळालेल्या माहितीनुसार, जोलेन डॉसन असे या प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचे नाव असून ती ऑस्ट्रेलियाची रहिवासी आहे. जोलेनला तिचा चेहरा मांजरीसारखा हवा होता. यासाठी तिने शस्त्रक्रिया करून तिचे रुप बदलण्याचा प्रयत्न केला. यासाठी तिने आधी ओठांची शस्त्रक्रिया केली. यानंतर तिने चेहऱ्यावरील हाडांना मांजरीच्या हाडांसारखा आकार देण्यासाठी दुसरी शस्त्रक्रिया केली. जोलीनने या शस्त्रक्रियेसाठी सुमारे 7 लाख रुपये खर्च केले.
दरम्यान, येवढा खर्च करूनही तिला हवा असलेला लूक तिला मिळाला नाही. याउलट तिच्या चेहऱ्याची स्थिती आणखीनच बिकट झाली. या शस्त्रक्रियेमुळे तिच्या शरीरात झालेल्या बदलांचा खूप नकारात्मक परिणाम झाला. यामुळे तिच्या गालावर जखमा आणि व्रण राहिले. यादरम्यान जोलीनने ही शस्त्रक्रिया प्रसिद्धी स्टंटसाठी केली असल्याचे कबुल केले. आता तिला या निर्णयाचा पश्चाताप होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List