WAVES 2025 : शाहरुख खान आणि अल्लू अर्जुन एकत्र येणार ? काय म्हणाले विजय देवरकोंडा ?
मुंबईत रुपेरी दुनियेतील चमचमत्या ताऱ्यांचा महाकुंभ भरला आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित वर्ल्ड ऑडीओ व्हीज्युअल एण्ड एन्टरटेन्मेंट समिटमध्ये ( WAVES ) देश आणि जगभरातील अनेक मोठ्या स्टारची मांदियाळी भरली आहे. या इव्हेंटच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ मे रोजी साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा यांची मुलाखत झाली. यावेळी भारतीय सिनेमाच्या भविष्याबद्दल बोलताना साऊथ आणि बॉलीवूडच्या कोलायब्रेशन आणि शाहरुख खान आणि अल्लु अर्जून यांचा उल्लेख केला.
या मुलाखतीत साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा यांनी जर दोन्ही सुपरस्टार कोणा एका चित्रपटात एकत्र आले तर हा भारतीय प्रेक्षकांसाठी मग ते साऊथ इंडियन असो वा नॉर्थ सर्वांसाठी धमाल मनोरंजन असेल. यावेळी विजय देवरकोंडा यांनी शाहरुख आणि अल्लु अर्जून यांच्या चित्रपटातील कमाईचा देखील उल्लेख केला.
विजय देवरकोंडा म्हणाले की शाहरुख सरांची चित्रपटाने ८०० ते १००० कोटींची कमाई केली आहे. तसेच साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जूनचे चित्रपट देखील १००० कोटींचा धंदा केलेला आहे. त्यामुळे कल्पना करा की जर हे दोन दिग्गज सुपरस्टार एकत्र आले तर किती मोठी मेजवाणी असेल. एक स्टार साऊथ येथील आहे तर दुसरा सुपरस्टार नॉर्थचा आहे. जर इंडियाचे दोन्ही स्टारना एकत्र आणणे म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानला एकत्र आणणे एकत्र आणल्यासारखे आहे असेही देवेरकोंडा यावेळी म्हणाले.
विजय देवरकोंडासोबत करीना कपूर आणि करण जोहर देखील स्टेजवर दिसले. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासूनच अनेक मोठे चेहरे दिसत आहेत. पहिल्या दिवशी शाहरुख खान, दीपिका पदुकोण, शेखर कपूर, अल्लू अर्जुन, हेमा मालिनी, मोहनलाल, चिरंजीवी आणि अक्षय कुमार यांसारखे स्टार स्टेजवर वेगवेगळ्या विषयांवर बोलताना दिसले.
WAVES च्या व्यासपीठावर चमचमते तारे
विजय देवरकोंडा यांच्यासह स्टेजवर करीना कपूर आणि करण जोहर देखील दिसले. कायक्रमाच्या पहिल्या दिवसांपासून मोठे स्टार स्टेजवर दिसले.यावेळी शाहरुख खान, दीपिका पादुकोण, शेखर कपूर, अल्लू अर्जुन, हेमा मालिनी, मोहनलाल, चिरंजीवी आणि अक्षय कुमार सारखे चमचमते सितारे व्यासपीठावर विविध विषयांवर बोलले.
दूसऱ्या दिवशी व्यासपीठावर बॉलीवुडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान देखील व्यासपीठावर त्यांच्या सोबत पीव्हीआर आयनॉक्सचे फाउंडर अजय बिजली आणि मॅडॉक फिल्म्सचे दिनेश विजान देखील हजर होते. तिघांनी ‘स्डूटिओज ऑफ फ्यूचर’ या ज्वलंत टॉपिकवर आपले मत मांडले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List