सुहाना खान, राशा थडानी ते रणबीर कपूरपर्यंत,… किती शिकलेले आहे हे स्टार किड्स?

सुहाना खान, राशा थडानी ते रणबीर कपूरपर्यंत,… किती शिकलेले आहे हे स्टार किड्स?

बॉलिवूड स्टार्सबद्दल जसं जाणून घेण्याची इच्छा असते त्याचपद्धतीने त्यांच्या मुलांबद्दल जाणून घेण्याचीही सर्वांनाच उत्सुकता असते. चाहत्यांना या स्टार्सकिड्सच्या जीवनशैलीबद्दल जाणून घ्यायचं असतं. पण तुम्हाला हे जाणून थोडं आश्चर्य वाटेल की बरेचसे स्टार किड्स फारसे शिकलेले नसूनही बॉलिवूडवर राज्य करत आहेत. कोण आहेत ते माहितीये का?

सुहाना खान: बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खानपासून सुरुवात करूया. 2023 मध्ये तिने ‘द आर्चीज’ या चित्रपटातून अभिनयाच्या जगात प्रवेश केला. ती लवकरच ‘किंग’ या चित्रपटातून थिएटरमध्ये पदार्पण करणार आहे. सुहाना खानने मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने इंग्लंडमधील आर्डिंगली कॉलेजमधून उच्च शिक्षण पूर्ण केले. तिने न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीच्या TISCH स्कूल ऑफ आर्ट्समधून ड्रामामध्ये पदवी देखील घेतली आहे.

आर्यन खान: आर्यन खानही बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानेही दिग्दर्शक म्हणून पदार्पण केल आहे. त्याची वेब सीरिज ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर, आर्यनने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. इंग्लंडमधील सेव्हनॉक्स स्कूलमधून हायस्कूल पूर्ण केल्यानंतर तो कॅलिफोर्नियाला गेला. जिथे त्याने यूएससी स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्समध्ये शिक्षण घेतलं. चित्रपट आणि टेलिव्हिजन निर्मितीमध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर, त्याने दिग्दर्शनाचे विशेष प्रशिक्षणही घेतलं आहे.

अनन्या पांडे: चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘केसरी चॅप्टर 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. तथापि, तिने 2019 मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनन्याने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधूनही शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने कॅलिफोर्निया विद्यापीठातून पदवी पूर्ण केली.

राशा थडानी: रवीना टंडन आणि चित्रपट वितरक अनिल थडानी यांची मुलगी, तिने ‘आझाद’ चित्रपटातून पदार्पण केले. तथापि, चित्रपटापेक्षा या गाण्याने जास्त प्रसिद्धी मिळवली. तिने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधूनही शिक्षण घेतले. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ती तिच्या परीक्षेची तयारी करायची.तिने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेतलं आहे.

सारा अली खान: सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान देखील चर्चेत असते. 2018 मध्ये ‘केदारनाथ’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत तिने अनेक चित्रपट केले आहेत. या अभिनेत्रीने तिचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील बेझंट मॉन्टेसरी स्कूलमधून केले. नंतर ती धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्येही गेली. त्यानंतर तिने न्यू यॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली.

रणबीर कपूर: रणबीर कपूरने बऱ्याच मुलाखतींमध्ये याबद्दल सांगितलं आहे की त्याला अभ्यासात फारसा रस नव्हता. त्याने मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून प्री-युनिव्हर्सिटी परीक्षा दिली. नंतर त्याने स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्समधून फिल्ममेकिंगचा कोर्सही केला आहे. रणबीरने ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधून मेथड अॅक्टिंग शिकली होती.

वरुण धवन: डेव्हिड धवनचा मुलगा वरुणने ‘ऑक्टोबर’ आणि ‘बावल’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांने यूकेमधील नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठातून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी प्राप्त केली.

जान्हवी कपूर: श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवीने ‘धडक’ चित्रपटातून पदार्पण केले. तथापि, त्याने मुंबईतील इकोल मोंडियल वर्ल्ड स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. पुढे धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. जान्हवीने कॅलिफोर्नियातील ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचा कोर्स केला आहे.

निशा देवगण: अजय देवगण आणि काजोलची मुलगी देखील खूप चर्चेत असते. तथापि, इतर स्टार किड्सप्रमाणे, निशानेही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. उच्च शिक्षणासाठी ती सिंगापूरलाही गेली होती. निशाने युनायटेड वर्ल्ड कॉलेज ऑफ साउथ ईस्ट एशियामधून पदवी प्राप्त केली. नंतर, तिने स्वित्झर्लंडच्या ग्लिओन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमधून आंतरराष्ट्रीय आतिथ्य विषयात पदवी प्राप्त केली.

टायगर श्रॉफ: 2014 मध्ये हिरोपंती या चित्रपटातून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु त्यापैकी बहुतेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. टायगरने अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी अ‍ॅमिटी विद्यापीठात गेला आहे आणि तिथून पुढील शिक्षण त्याने तिथे घेतले आहे.

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Weather Forecast : पाऊस तांडव करणार, 7 राज्यांना रेड अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी IMD Weather Forecast : पाऊस तांडव करणार, 7 राज्यांना रेड अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
अनेक राज्यांमध्ये सध्या हवामानात मोठा बदला पाहायला मिळत आहे. भारताच्या काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे, वाढत्या उन्हाचा नागरिकांना मोठा फटक...
‘मी बालसाहित्य वाचत नाही’; फडणवीसांची संजय राऊतांच्या पुस्तकावर एका वाक्यात प्रतिक्रिया
रुपारेल कॉलेजमधल्या मुलीवर असं जडलं सचिन पिळगांवकर यांचं प्रेम; अशोक सराफांनी सांगितला किस्सा
समांथा रुथ प्रभू डेट करते दिग्दर्शकाला? पूर्व पत्नीला कळताच…
जिथे न्याय मिळतो तिथेच विनयभंग, सर्वोच्च न्यायालयात अभिनेत्रीसोबत छेडछाड, धक्कादायक प्रकरण समोर
Pahalgam Attack – तुम्ही हिंदूंना का शिवीगाळ करता? जावेद अख्तर पाक लष्कर प्रमुख असीम मुनीरवर भडकले
Operation Sindoor- हिंदुस्थानने मिराज, JF-17 सह पाकिस्तानची 5 लढाऊ विमानं पाडली