आधी प्रशंसा करायची आणि मग टीका, हेच भाजपचे राजकारण; कर्नल सोफिया कुरैशी यांच्या अपमानावर शंकराचार्य यांची टीका
मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण म्हटले होते. त्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. यानंतर कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबियांनी शहा यांना मंत्रीपदावरून तत्काळ हटवण्याची मागणी केली. याच प्रकरणी आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपवर टीका केली आहे. जे यांच्या मनात होतं, तेच सगळं बाहेर आलं आहे. आणि भाजप पहिल्यापासूनच अशा गोष्टी करत आला आहे, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.
त्यांनी धर्म विचारून मारले, आम्ही कर्म बघून संपवले; राजनाथ सिंह यांची एलओसीवरील छावणीला भेट
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी कर्नल सोफिया यांच्या प्रकरणावर बोलताना भाजपला खडे बोल सुनावले. ज्या पक्षाचे प्रवक्ते मुस्लिम असतात, जो पक्ष सतत मुस्लिम प्रवक्त्यांची निवड करतो. त्यांचाच मुस्लिमांबद्दल असा दृष्टिकोन असतो. याचा अर्थ त्यांच्या मनात काहीतरी वेगळे आहे आणि ते काहीतरी वेगळेच दाखवत आहेत. हे आता उघड झाले आहे. शहा यांच्यावर गुन्हा दाखल झाला हे ठीक आहे, पण शिक्षा कुठे आहे? जेव्हा आपल्या सैन्याने एखाद्याला पद आणि जबाबदारी दिली आहे तेव्हा, त्यांनी काही विचार करून ती दिली असेल. आणि तुम्ही त्यांच्या विरुद्ध अशा टिप्पण्या करत आहात. हा या पक्षाचा नियम बनला आहे. आधी प्रशंसा करायची आणि मग टीकाही करायची. हे त्यांचे राजकारण आहे, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीबाबत करार झाला आहे. यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आपले मत मांडले. “पाकिस्तानच्या अनेक प्रांतांमध्ये एक वेगळी सेना तयार झाली होती, आणि ती पाकिस्तानच्या सैन्याविरुद्ध लढण्यास उभी देखील राहिली होती. अशा संधी वारंवार येत नाहीत. संपूर्ण देशाला असे वाटत होते की आपण पाकिस्तानविरुद्ध कारवाई करावी आणि अशी कारवाई करावी जी पाकिस्तान विसरू शकत नाही. मात्र, इतकी चांगली संधी हुकली, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यावेळी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List