समांथा रुथ प्रभू डेट करते दिग्दर्शकाला? पूर्व पत्नीला कळताच…
‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजचे दिग्दर्शक राज निदिमोरु आणि दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू यांच्या नात्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांत दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की राज आणि सामंथा एकत्र राहणार आहेत. मात्र, काही अहवालांनुसार, सामंथाच्या मॅनेजरने या अफवा फेटाळून लावल्या आहेत. या सर्व घडामोडी राज निदिमोरुची पूर्व पत्नी श्यामली डेला कळताच तिने प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाली पूर्व पत्नी?
राज निदिमोरुची पूर्व पत्नी श्यामली डेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिने “मी त्या सर्वांना आशीर्वाद आणि प्रेम पाठवते जे माझ्याबद्दल विचार करतात, माझी काळजी घेतात, माझे ऐकतात, माझ्याबद्दल ऐकतात, माझ्याशी बोलतात, माझ्याबद्दल बोलतात, माझ्याबद्दल वाचतात, माझ्याबद्दल लिहितात आणि मला भेटतात” या आशयाची पोस्ट केली आहे.
वाचा: मधुचंद्राच्या रात्रीची तयारी, पत्नी म्हणाली थांब आलेच; मग घेऊन आली दूध, पतीचा बदलला मूड अन्…
सामंथा आणि राज यांच्या नात्याची सुरुवात
सामंथा प्रभू आणि राज निदिमोरु यांच्या नात्याच्या अफवा दोन वर्षांपूर्वी सुरू झाल्या आहेत. त्यावेळी राज पत्नी श्यामली डे पासून विभक्त झाला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, या प्रकरणावर एका जवळच्या सूत्राने सांगितले की, “श्यामली डे यांनी जे काही लिहिले आहे त्याचा राज आणि सामंथाशी काहीही संबंध नाही. त्या राज यांच्यापासून विभक्त झाल्या आहेत. खरे तर, सामंथा कधीही विवाहित पुरुषाशी नाते ठेवणार नाही. तिने राज यांच्याशी नाते तेव्हाच सुरू केले जेव्हा ते आपल्या पत्नीपासून वेगळे झाले आणि एकटे राहत होते.”
राज निदिमोरु यांना मुले आहेत?
याशिवाय, इतर चुकीच्या बातम्यांचे स्पष्टीकरण देताना सूत्राने सांगितले, “अहवालांमध्ये असा दावा केला जात आहे की राज आणि त्याच्या पूर्व पत्नीला एक मुलगी आहे. हे पूर्णपणे खोटे आहे. राजला त्याच्या पूर्व पत्नीपासून कोणतेही अपत्य नाही. आतापर्यंत, सामंथाने तिच्या नात्याबाबत मौन बाळगले आहे कारण तिला याबाबत बोलायचे नाही.”
राज निदिमोरु आणि सामंथा यांच्या डेटिंगच्या अफवा
सामंथा रुथ प्रभू आणि राज निदिमोरु यांच्या नात्याच्या अफवा वेब सीरिजच्या वेळी सतत एकत्र दिसल्यामुळे पसरल्या आहेत. राजने डीकेसोबत मिळून पहिल्यांदा ‘द फॅमिली मॅन 2’ साठी सामंथासोबत काम केले. त्यानंतर सामंथाने पुन्हा राज आणि डीकेसोबत ‘सिटाडेल: हनी बनी’ या सीरिजमध्ये वरुण धवनसोबत काम केले. आता ती राज आणि डीकेच्या आगामी सीरिज ‘रक्त ब्रह्मांड’मध्ये आदित्य रॉय कपूरसोबत दिसणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List