रुपारेल कॉलेजमधल्या मुलीवर असं जडलं सचिन पिळगांवकर यांचं प्रेम; अशोक सराफांनी सांगितला किस्सा

रुपारेल कॉलेजमधल्या मुलीवर असं जडलं सचिन पिळगांवकर यांचं प्रेम; अशोक सराफांनी सांगितला किस्सा

अभिनेते सचिन पिळगांवकर यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट ‘मायबाप’ हा होता. या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ यांनी एका गुजराती शेठची भूमिका साकारली होती. सचिन हे अशोक सराफ यांच्यापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान आहेत. तरीही या दोघांच्या मैत्रीत वयातील हे अंतर कधीच आड आलं नाही. ‘मायबाप’च्या सेटवर या दोघांमध्ये झालेली मैत्री ही फक्त त्या चित्रपटापुरती मर्यादित राहिली नाही. हे दोघं एरवीही भेटायला लागले होते. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. त्यापैकी ‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा सचिन यांच्या करिअरमधील खास चित्रपट ठरला होता. कारण या चित्रपटाने त्यांना त्यांच्या खऱ्या आयुष्यातील नवरीही मिळवून दिली होती. अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात दोघांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.

‘नवरी मिळे नवऱ्याला’ ही सोशल कॉमेडी होती. सचिन पिळगांवकर यांच्या दिग्दर्शकाने ती आणखीनच गंमतीशीर झाल्याचं अशोक सराफ सांगतात. या चित्रपटाने सिल्व्हर ज्युबिली केली होती. कॉलेजमधील तरुण प्रेक्षकवर्ग थिएटरकडे खेचण्यात ते यशस्वी झाले होते. तेव्हापासूनच अशा प्रकारच्या चित्रपटांचा ट्रेंड सुरू झाला होता. या चित्रपटात सुप्रिया सबनीस या रुपारेल कॉलेजमधल्या मुलीची मुख्य नायिकेसाठी निवड झाली होती. याच चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान सचिन तिच्या प्रेमात पडला होता. चित्रपटासाठी सुप्रिया यांची निवड होणं, शूटिंगदरम्यान सचिन यांचं सुप्रिया यांच्यावर प्रेम जडणं, शूटिंग संपल्यानंतर त्यांनी लग्नासाठी मागणी घालणं आणि दोघांचं लग्न होणं.. हे सर्व एखाद्या परीकथेसारखं असल्याचं अशोक सराफ सांगतात.

सुप्रिया सबनीस या लग्नानंतर सुप्रिया पिळगांवकर झाल्या. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. तरीसुद्धा त्यांच्या अभिनयात कुठेच नवखेपणा नव्हता आणि एखाद्या कसलेल्या कलावंतासारखं त्यांनी काम केलं, अशा शब्दांत अशोक सराफ यांनी कौतुक केलं. काही लोकांकडे जन्मजात देणगी असते, ती सुप्रियाकडे आहे, असंही त्यांनी या आत्मचरित्रात म्हटलंय. सुप्रिया कॅमेरा ऑन होण्यापूर्वी वेगळ्या असतात आणि अॅक्शन म्हटलं की वेगळ्याच होतात, असा अनुभव अशोक सराफांनी त्यात लिहिलंय. हाच अनुभव त्यांना बॉलिवूड अभिनेत्री काजोलच्या बाबतीतही आला होता. “मी तिला सेटवर भंकस करताना बघितलंय, पण क्लॅप बसला की तिच्यात एकदम बदल होऊन जातो. कुणीतरी वेगळीच बनते ती”, असं ते म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;