विक्की कौशल दर महिन्याला भरतो इतके लाख घरभाडे; तर 3 वर्षांचे इतके करोड
बॉलिवूडचे असे बरेच सेलिब्रिटी आहेत जे करोडोंची संपत्ती असतानाही भाड्याच्या घरात राहतात. यात चर्चा होते ते सेलिब्रिटींच्या घराची आणि घरभाड्याची. यामध्येच अभिनेता विकी कौशलचाही समावेश आहे.तो राहत असलेल्या घराची आणि घरभाड्याची चर्चा होताना दिसते. अभिनेता विकी कौशल मुंबईतील पॉश परिसर असलेल्या जुहूमध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याने या घराचे 3 वर्षांसाठी नूतनीकरण केलं आहे.तसेच त्यासाठी त्याने मोठी रक्कम दिली आहे. अशा परिस्थितीत ही रक्कम ऐकून लोक हैराण होत आहेत.
विकी कौशल भरणार एवढं भाडं
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो ते 258.84 चौरस फूट जागेत पसरलेले आहे. याशिवाय त्यात 3 कार पार्किंगची सुविधा देखील आहे. या घराच्या लीजची (भाडेपट्टी) एप्रिल 2025 मध्ये पुन्हा नोंदणी करण्यात आली आहे. विकीने तीन वर्षांसाठी पुन्हा एकदा या घराची लीज रिन्यू केली आहे. विकीच्या घराचे महिन्याचे भाडे हे आता 17.1 लाख रुपये आहे.
दुसऱ्या वर्षी देखील हे भाडे दरमहा17.01 लाख रुपये असेल आणि तिसऱ्या वर्षी दर महिन्याचे भाडे हे 17.86 लाख होईल. अशाप्रकारे, तो तीन वर्षांत सुमारे 6.2 कोटी रुपये भाडे देईल. जे सामान्य माणसासाठी खूपच मोठी रक्कम आहे. माहितीनुसार, या करारांतर्गत, विकीने 1.69 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि 1000 रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. यासोबतच त्यांनी 1.75 कोटी रुपये सिक्योरिटी डिपॉजिट म्हणून जमा केले आहेत. विकी गेल्या 5 वर्षांपासून या अपार्टमेंटमध्ये राहत आहे. त्यावेळी त्याचे भाडे दरमहा 8 लाख रुपये होते.
मुंबईच्या या भागात राहतात बहुतेक सेलिब्रिटी
जुहू हे मुंबईतील सर्वात लोकप्रिय परिसरांपैकी एक आहे. या परिसरात अनेक सेलिब्रिटी राहतात. हा परिसर त्याच्या सुंदर समुद्रकिनारे आणि आलिशान रेस्टॉरंट्ससाठी ओळखला जातो. स्क्वेअर यार्ड्सच्या आयजीआर प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कागदपत्रांनुसार, वरुण धवन, शाहरुख खान, सलमान खान, जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन आणि शक्ती कपूर यांसारख्या बॉलिवूड स्टार्सचीही जुहूमध्ये घरे आहेत.
विकी कौशलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर….
दरम्यान विकी कौशलच्या कामाबद्दल बोलायच तर त्याने आजपर्यंत जे काही मिळवलं आहे ते त्याच्या मेहनतीच्या आपल्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. तो त्याच्या प्रभावी अभिनयासाठी आणि विविध भूमिकांसाठी ओळखला जातो. विकीला खरी प्रसिद्धी ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटातून मिळाली. यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. याशिवाय त्यांनी मसान, राजी, संजू आणि सरदार उधम सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. तर विकी शेवटचा ‘छवा’ चित्रपटात दिसला होता. त्यातून खूप पैसे कमवले होते. विकीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात दिसणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List