“तेव्हा संजय दत्तने कुराण भेट दिली होती”; अमीषा पटेलचा खुलासा

“तेव्हा संजय दत्तने कुराण भेट दिली होती”; अमीषा पटेलचा खुलासा

अभिनेत्री अमीषा पटेल आणि संजय दत्त यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. अमीषाने नुकतेच इंडस्ट्रीत 25 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत ती मित्र संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, हृतिक रोशन, सलमान खान, संजय दत्त आणि सनी देओल यांच्यासोबत कसं नातं आहे, याविषयीही अमीषाने सांगितलं. संजय दत्तबद्दल बोलताना अमीषाने खुलासा केला की, तिने मान्यतासाठी खास बेबी शॉवरचं आयोजन केलं होतं.

‘फिल्मीमंत्रा मीडिया’च्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अमीषा म्हणाली, “जेव्हा मान्यता गरोदर होती, तेव्हा मी बेबी शॉवरचं आयोजन केलं होतं. त्यावेळी आम्हाला माहीत नव्हतं की जुळ्यांपैकी एक मुलगा आणि दुसरी मुलगी असेल. या बेबी शॉवरला संजूच्या दोन्ही बहिणीसुद्धा आल्या होत्या. तो कार्यक्रम खूपच सुंदर होता. त्यानंतर जेव्हा शाहरान आणि इकरा यांचा जन्म झाला, तेव्हा संजूने ज्या भेटवस्तू आम्हाला आम्हाला पाठवल्या होत्या, त्यात कुराण आणि भगवदगीता यांचा समावेश होता. कारण मान्यता ही मुस्लीम आहे आणि संजू हिंदू आहे. ही सर्वोत्तम भेट होती.”

यावेळी अमीषा तिच्या खासगी आयुष्याबद्दल आणि कधीच लग्न न करण्याच्या निर्णयाबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाली. ती पुढे म्हणाली, “मी माझ्या अवतीभवती सर्व प्रकारची नाती पाहिली आहेत. संजू आणि मान्यतासारखं प्रेमळ नातंही पाहिलंय आणि हृतिक-सुझानसारखंही नातं पाहिलंय, जिथे दोघंही विभक्त झाल्यानंतरही मुलांची खूप चांगल्याप्रकारे एकत्रित काळजी घेत आहेत. दोघांमध्ये आजही खूप चांगली मैत्री आहे. सलमानबद्दल बोलायचं झाल्यास, मी प्रामाणिकपणे म्हणेन की त्याचं लग्न व्हावं अशी माझी इच्छा नाही. तो जसा आहे तसा खूप चांगला आणि कूल आहे. सलमान खूपच प्रेमळ आणि काळजी घेणारा माणूस आहे.”

अमीषा पटेलने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील अमीषा आणि हृतिकची जोडी तुफान हिट झाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

इंस्टाग्रामने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिशा अग्रवालचा जीव घेतला? आत्महत्या की हत्या? मृत्यूचे धक्कादायक कारण समोर इंस्टाग्रामने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिशा अग्रवालचा जीव घेतला? आत्महत्या की हत्या? मृत्यूचे धक्कादायक कारण समोर
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मीशा अग्रवालने 24 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. तिच्या कुटुंबीयांकडूनच याबाबतची माहिती सांगण्यात आली. पण तिच्या मृत्यूचे...
पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांना धक्का बसला? पाळलं मौन, 8 दिवसांपासून करतायत फक्त ‘या’ गोष्टी
‘लग्नानंतर माझी रात्रीची झोप उडाली होती’, माधुरी दीक्षिने सांगितला डॉ. नेनेंसोबतचा लग्नानंतरचा अनुभव
पीक विमा योजनेतील नवा ‘फडणवीस विमा पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक: हर्षवर्धन सपकाळ
Caste Census देशात जातीनिहाय जनगणना होणार, विरोधकांच्या मागणीला यश
Intel कंपनी 20 टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ, सीईओ लिप बू टॅन यांनी लिहिले पत्र
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईदचा लाहोरमधील सिक्रेट ठिकाणा उघड!