पाकिस्तानात आपण कोणाला खूश करतोय? पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तरांचा रोखठोक सवाल
Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. तर अनेक पर्यटक गंभीर जखमी देखील आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिव्र संताप व्यक्त केला आहे. सध्या देशात हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळलेली असताना लेखक जावेत अख्तर यांनी रोखठोक प्रश्न विचारले आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी संताप व्यक्त केला आहे.
मुलाखतीत पहिला प्रश्न उपस्थित करत जावेद अख्तर म्हणाले, ‘पाकिस्तानी कलाकारांना भारतात येऊ दिलं पाहिजे? यावर दोन उत्तरं आहेत. हे नातं कायम एकतर्फी राहिलं आहे. नुसरत फतेह अली खान, गुलाम अली, नूरजहां भारतात आले. आपण त्यांचं उत्तम स्वागत केलं. फैज अहमद फैज जे महान कवी होते. ते पाकिस्तानात राहायचे. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात जेव्हा ते भारतात आले तेव्हा त्यांना राष्ट्रप्रमुखासारखे वागवलं गेलं आणि सरकारने त्यांना खूप आदर दिला. ‘
लता मंगेशकर यांच्यावर जावेद अख्तर काय म्हणाले?
‘भारताना पाकिस्तानी कलाकारांचा आदर केला पण मला नाही वाटत पाकिस्तानने काधी याचं उत्तर दिलं. मला पाकिस्तानी लोकांसोबत वैर नाही. पकिस्तानातील मोठ्या कलाकारांनी लता मंगेशकर यांच्यासाठी गाणी लिहिली आहेत. 60 – 70 च्या दशकात तर लता मंगेशकर भारत आणि पाकिस्तानच्या आवडत्या गायिका होत्या पण लता मंगेशकर यांचा एकही कार्यक्रम पाकिस्तानात झाला नाही…’ असं देखील जावेद अख्तर म्हणाले.
पाकिस्तानमध्ये आपण कोणाला खूश करत आहोत?
रोखठोक सवाल उपस्थित करत जावेद अख्तर म्हणाले, ‘पाकिस्तानी लोकांची तक्रार मी कधीच करणार नाही. कारण त्या देशात देखील लता मंगेशकर यांच्या चाहत्यांची संख्या मोठी होती. पण काही अडथळे होते, व्यवस्थेमध्ये काही चुका आहेत. हे नातं एकतर्फी आहे.
दुसरा प्रश्न देखली तितकाच महत्त्वाचा आहे. जर आपण पाकिस्तानी कलाकारांना ब्लॉक केले तर आपण पाकिस्तानात कोणाला खूश करत आहोत? लष्कर आणि कट्टरपंथी यांना, त्यांना हेच हवं आहे का? त्यांना फक्त दुरावा निर्माण करायचा आहे. अशाप्रकारे या दोन बाजू सांगता येतील, पण सध्याच्या काळात असे प्रश्न उपस्थित करणं योग्य नाही. असं देखील जावेद अख्तर म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List