‘…म्हणून दहशतवाद्यांनी धर्म विचारला’, पहलगाम हल्ल्यावर अबू आझमी यांंचं मोठं वक्त्यव्य

‘…म्हणून दहशतवाद्यांनी धर्म विचारला’, पहलगाम हल्ल्यावर अबू आझमी यांंचं मोठं वक्त्यव्य

पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यावर आता पहिल्यांदाच सपा नेते अबू आझमी यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. काश्मीरच्या पहलगाममध्ये जे झालं त्यावर सगळेच मुस्लीम ओरडून सांगत आहेत, आम्ही सरकार बरोबर आहोत. सरकारने या दहशतवाद्यांविरोधात  कठोर ॲक्शन घ्यावी अशी ते मागणी करत असल्याचं आझमी यांनी यावेळी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले आझमी? 

काश्मीरच्या पहलगाममध्ये जे झालं त्यावर सगळेच मुस्लीम ओरडून सांगत आहेत, आम्ही सरकार बरोबर आहोत. सरकारने या दहशतवाद्यांविरोधात  कठोर ॲक्शन घ्यावी अशी ते मागणी करत आहेत. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, कारण त्यांना हे चांगलं माहीत होतं की असं केलं तर भारतामध्ये हिंदू -मुस्लीम होईल.  ज्या ठिकाणी हल्ला झाला, तेथील मुस्लीम बांधव बचावासाठी धावून आले, मदत कर्य केलं. मात्र भारतातील मुसलमान लोकांना अशी वागणू का दिली जात आहे? असा सवाल यावेळी आझमी यांनी उपस्थि केला आहे.

ज्यांनी हिंदूंना मारले त्यांना मारा आम्हाला का त्रास देत आहात? मुंबईच्या दादरसह भारतात अनेक ठिकाणी मुस्लीम लोकांना मारहाण केली जात आहे.  सगळ्यात मोठी बाब म्हणजे निवडून आलेले आमदार देखील अशी वक्तव्य करत आहेत. संविधानाची शपथ घेऊन नितेश राणे रत्नागिरीत जाऊन हनुमान चालीसा वाचायला सांगत  आहेत. हिंदू मुस्लीम करत आहेत,   मी पंतप्रधान , सरकार, मोहन भागवत यांच्यासह सर्वांना विनंती करतो की जातीयवाद होऊ देऊ नका. यासंदर्भात एक पत्रक काढून आदेश देण्याची गरज आहे. सरकार ज्या गोष्टी आणत आहेत, त्या सगळ्या मुस्लिम विरोधात आहेत. वक्फ बोर्ड कायदा तोही मुसलमान विरोधात आहे, तो आम्हाला नको आहे.  सगळे हिंदू मुस्लिम यांना लढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपही यावेळी आझमी यांनी केला आहे.

मी दोन वेळा नितेश राणे यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटलो. पत्रही दिले आहे. आता पुन्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना पत्र देणार आहोत, असंही यावेळी आझमी यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवृत्तीनंतर विराट आणि अनुष्काचा आहे हा प्लॅन? स्वत:च सांगितलं निवृत्तीनंतर विराट आणि अनुष्काचा आहे हा प्लॅन? स्वत:च सांगितलं
सर्वांच्या मनावर राज्य करणारा क्रिकेटर, सर्वांचा लाडका खेळाडू विराट कोहलीने कसोटी क्रिकेट खेळण्यातून आता निवृत्ती घेतली आहे. त्याच्या निर्णयाने नक्कीच...
बिग बींनी सोडला होता भारत, 6800 किमी दूर असलेल्या या देशात झाले स्थायिक
पाकड्यांच्या कुरापती सुरुच, पंतप्रधानांच्या भाषणानंतर सांबा सेक्टरमध्ये पुन्हा ड्रोन दिसले
IPL 2025 – आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून सुरू होणार सामने
पापाने व्यापार बंद करनेकी धमकी देकर वॉर रुकवा दी, संजय राऊत यांचा निशाणा
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार आणि युद्धबंदीवर केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं, काँग्रेसची मागणी
जालन्यात वीज पडून तरुण शेतकर्‍याचा मृत्यू