सुपरस्टार अभिनेत्याचे कठोर व्रत; चित्रपटाच्या यशासाठी 41 दिवस अनवाणी,फक्त काळे कपडे घातले, मिळाला थेट ऑस्कर

सुपरस्टार अभिनेत्याचे कठोर व्रत; चित्रपटाच्या यशासाठी 41 दिवस अनवाणी,फक्त काळे कपडे घातले, मिळाला थेट ऑस्कर

जेव्हा चित्रपट रिलीज होणार असतो तेव्हा तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल की नाही, चित्रपटाला यश मिळेल की नाही याबाबत सर्वच कलाकारांना चिंता असते. एवढंच नाही तर आपल्या चित्रपटाला पुरस्कार मिळावा ही तर संपूर्ण टीमची इच्छा असते. त्यातल्या त्यात ऑस्कर हा चित्रपट जगतातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. त्याबद्दल तर प्रत्येक कलाकार स्वप्न पाहत असतो.

अभिनेत्याची चित्रपटाच्या यशासाठी कठीण उपासना

आपल्या चित्रपटाच्या यशासाठी कलाकार देवाकडेही मनोभावे प्रार्थना करतात. काहीजण उपवास करतात, काही जण मोठ्या धार्मिक स्थळी जाऊन परमेश्वरासमोर नतमस्तक होतात. अशाच एका अभिनेत्याने त्याच्या चित्रपटाच्या यशासाठी कठीण उपासना केली होती. त्याने व्रत ठेवलं होतं त्यासाठी तो तब्बल 41 दिवस अनवाणी फिरत होता. अखेर त्याचं गाऱ्हाणे देवाने ऐकले आणि त्याच्या चित्रपटाला ऑस्कर मिळाला असं भरभरून यश मिळालं.

कडक व्रत ठेवलं

हा चित्रपट म्हणजे साउथचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘आरआरआर’ आणि ज्याने यासाठी कडक व्रत ठेवलं होतं तो अभिनेता म्हणजे त्यात मुख्य भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता राम चरण. राम चरणने त्याच्या कारकिर्दीत एकामागून एक हिट चित्रपट दिले. मात्र त्याला खरं यश एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाद्वारे मिळाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

व्रतात 41 दिवस अनवाणी आणि फक्त काळे कपडे घालायचे

चित्रपटाच्या यशासाठी त्याने कठोर साधना आणि तपस्या केली होती. तो 41 दिवस अनवाणी राहिला आणि तो फक्त काळे कपडे घालत होता. राम चरण हे भगवान अयप्पा यांचा महान भक्त आहे. अनेक लोक 41 दिवस भगवान अय्यप्पाची कठोर साधना करतात. यामध्ये साधकाला 41 दिवस अनवाणी राहावे लागते. शाकाहारी जेवण घ्यावे लागते आणि फक्त काळ्या रंगाचे कपडे घालावे लागतात. याशिवाय, इतर अनेक कठोर नियमांचे पालन करावे लागते.

41 दिवसांनंतर, केरळमधील सबरीमाला येथील अयप्पा स्वामी मंदिरात जाऊन भक्तांना साधना पूर्ण करावी लागते. आरआरआरच्या रिलीजच्या वेळी, राम या साधनेत होता. एका रिपोर्टनुसार राम चरण वयाच्या 20 व्या वर्षापासून ही साधना करत आहेत आणि तो वर्षातून दोनदा त्यात भाग घेतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 2023 मध्ये ऑस्कर जिंकला

राम चरणसोबत ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांसारख्या कलाकारांनीही ‘आरआरआर’मध्ये काम केले होते. या चित्रपटाने जगभरात 1250 कोटी रुपये कमावले तसेच या चित्रपटाने 2023 मध्ये ‘नातू नातू’ या गाण्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट मूळ गाणे’ श्रेणीत ऑस्कर जिंकला.

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पहलगाम हल्ल्यानंतरच नौदल युद्ध तयारीसह समुद्रात उतरले होते – व्हाइस अॅडमिरल ए एन प्रमोद पहलगाम हल्ल्यानंतरच नौदल युद्ध तयारीसह समुद्रात उतरले होते – व्हाइस अॅडमिरल ए एन प्रमोद
पहलगाम हल्ल्यानंतरच नौदल युद्ध तयारीसह समुद्रात उतरले होते, अशी माहिती व्हाइस अॅडमिरल ए एन प्रमोद यांनी दिली. रविवारी हिंदुस्थानच्या तिन्ही...
LOC वर पाकिस्तानला धक्का, 40 सैनिक ठार; सर्व हिंदुस्थानी पायलट सुरक्षित; सैन्यदलांच्या प्रमुखांनी दिली माहिती
ceasefire : ‘तुमचे रणगाडे, प्लेन, मिसाईल हे खपवण्याकरता…,’ काय म्हणाले उदयनराजे भोसले ?
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा, सैन्यदलांच्या प्रमुखांनी दिली महत्त्वाची माहिती
स्मिता पाटीलचा लेक ‘गे’ आहे? बॉलिवूडमध्ये होती चर्चा, अनेकांनी केलं प्रपोज; सत्य काय?
रेखा किंवा जया बच्चन नाही… अमिताभ बच्चन यांनी या बॉलिवूड अभिनेत्रीसाठी पाठवले होते ट्रक भरून गुलाब
बाथटबमध्ये उतरली 25 वर्षीय अभिनेत्री, बिना कपडे हिरोसोबत दिसली; इंटरनेटवर खळबळ