‘थोडं तरी वयाचं भान…’, दुसऱ्या बाळाबद्दल विचारताच अभिषेक बच्चनचं लक्षवेधी उत्तर

‘थोडं तरी वयाचं भान…’, दुसऱ्या बाळाबद्दल विचारताच अभिषेक बच्चनचं लक्षवेधी उत्तर

Abhishek Bachchan On Second Child: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांच्या नात्याबद्दल सर्वत्र अनेक चर्चे रंगल्या आहे. पण रंगणाऱ्या चर्चांचा अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यावर कोणताच फरक पडत नसल्याचं दिसून येत आहे. दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत नव्या आयुष्याची सुरुवात केली.

लग्नाच्या 4 वर्षांनंतर ऐश्वर्या आणि अभिषेक लेक आराध्या हिचं जगात स्वागत केलं. आज आराध्य बच्चन हिला देखील कोणत्या ओळखीची गरज नाही. आई – वडील आणि आजी – आजोबांप्रमाणे आराध्या देखील कायम चर्चेत असते. दरम्यान, अभिषेक बच्चन याची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे.

 

 

ज्यामध्ये अभिषेक याला दुसऱ्या बाळाबद्दल विचारण्यात आलं. यावर अभिषेकने असं उत्तर दिलं, ज्यामुळे जमलेले सर्व प्रेक्षक पोट धरुन हसू लागले.
अभिनेता रितेश देशमुख याने ‘केस तो बनता है’ शोमध्ये अभिषेक याला दुसऱ्या बाळाबद्दल विचारलं. सुरुवातील रितेशने अभिषेकला विचारलं, तुमच्या कुटुंबात अनेकांची नावे ‘अ’ अक्षराने सुरु होत आहेत. अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या… तर जया काही आणि श्वेताने असं काय केलं? यावर हसत अभिषेक म्हणाला, ‘याचं उत्तर त्यांनाच जाऊन विचारावं लागेल…’

दुसऱ्या बाळाबद्दल अभिषेक म्हणाला…

अभिषेक बच्चन म्हणाला, ‘आता आमच्या घरात परंपरा आहे, अभिषेक, आराध्या…’ यावर रितेश म्हणतो, ‘आराध्याच्या नंतर? म्हणजे माझा मुलगा रियान आणि राहील आहे…’ यावर अभिषेक लाजतो आणि म्हणतो, ‘वयाचं भान ठेव यार… मी तुझ्यापेक्षा मोठा आहे…’ अभिषेकचं उत्तर ऐकल्यानंतर जमलेले प्रेक्षक हासू लागतात.

रितेश आणि अभिषेक यांचे आगामी सिनेमे

रितेश आणि अभिषेक यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. आता पुन्हा दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालणार आहे. ‘हाऊसफुल 5’ सिनेमाच्या माध्यमातून दोघे चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चाहते देखील गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;