चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी सांगलीत एकसंघ प्रचाराचा धडाका; महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्धार

चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी सांगलीत एकसंघ प्रचाराचा धडाका; महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्धार

सांगली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांनी एकसंघ प्रचाराचा धडाका लावून चंद्रहार पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला.

सांगली मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांच्या नेत्यांची आज सांगलीत बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते, आमदार डॉ. विश्वजीत कदम, शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्यासह सर्वच पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी हातात हात घालून उमेदवार चंद्रहार पाटील यांची विजयश्री खेचून आणण्यासाठी जे जे करावे लागेल, ते करण्याची ग्वाही सर्वच नेत्यांनी दिली. सांगली मतदारसंघात पैलवान चंद्रहार पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. अनेक ठिकाणी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकसंघपणे काम केल्यास हे यश सोपे होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. तर, महाविकास आघाडीचा धर्म पाळून यापुढे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी ताकदीने कामाला लागतील, असा विश्वास काँग्रेसचे नेते, आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.

या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय बजाज, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, जिल्हा संघटक बजरंग पाटील, दिगंबर जाधव, काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शिवसैनिकांकडून प्रचाराचा धडाका

n शिवसैनिकांनी चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठय़ा जोमाने कामाला लागले असून, चंद्रहार पाटील यांच्या विजयाची खात्री निर्माण झाली आहे. कार्यकर्ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. सर्वत्र ‘एकच वादा, चंद्रहारदादा’चा जयघोष पाहायला मिळत आहे. या प्रचारामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल
सांगली मार्केट यार्डातील रस्ता पावसाळ्यापूर्वीच खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्डय़ात रस्ता, अशी रस्त्याची दयनीय स्थिती मार्केट यार्ड परिसरात...
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया जुलैमध्ये?
पतसंस्थेची फसवणूक; व्यापाऱयाला सक्तमजुरीची शिक्षा, चार लाखांचा दंड
गणेशमूर्ती करणाऱ्या 130 कारखान्यांना नोटिसा, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नगर महापालिकेची मोहीम
नोकरदारांना दिलेल्या कर्जाचे 28 कोटी थकले, वसुलीसाठी सांगली जिल्हा बँकेची विशेष मोहीम
एमसीए प्रेसिडेंट चषक; माटुंगा जिमखान्याला सी आणि डी डिव्हिजनचे जेतेपद
महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांना असुविधांचा फटका, वेण्णालेक ते महाडनाका दरम्यानच्या फुटपाथची दुरवस्था