दुर्घटना घडल्यास महसूल अधिकाऱयांवर गुन्हा दाखल करू; महर्षी वाल्मीकी संघटनेचा इशारा
पूर्वी पंढरपुरातील वाळूचोरी छोटय़ा वाहनांमधून व्हायची. चंद्रभागेच्या पात्रात पडणारे लहान खड्डे धोकादायक होते. अनेक भाविकांचा या खड्डय़ांमध्ये बुडून बळी गेलाय. आता मोठमोठय़ा वाहनांमधून होत असलेल्या वाळू तस्करीमुळे तसेच मोठमोठय़ा वाहनांमधून होत असलेल्या चंद्रभागेच्या पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. उजनीतून सोडलेले पाणी पंढरपुरातील नदीपात्रात आल्यावर आणखी धोकादायक परिस्थिती निर्माण होणार आहे. या खड्डय़ात बुडून काही दुर्घटना घडली, तर आम्ही थेट अवैध वाळू उपशाकडे दुर्लक्ष करणाऱया महसूल अधिकाऱयांकर 302 कलमान्वये गुन्हा दाखल करू, असा इशारा महर्षी वाल्मीकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
गणेश अंकुशराव म्हणाले, ‘गेल्या कित्येक वर्षांपासून चंद्रभागेच्या पात्रातील अवैध काळू उपशाविरुध्द आम्ही आवाज उठवत आहोत, मागील काळात या प्रश्नाकरूनच आम्ही तत्कालीन तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या बदलीची मागणी केली, त्यांची बदलीही झाली. परंतु, यानंतर आलेल्या अधिकाऱयांनीसुध्दा या प्रश्नाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचे ठळकपणे दिसून येत आहे.
नुकतेच उजनी धरणातून चंद्रभागेच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी पंढरपुरात आल्यानंतर नदीपात्रातील पाण्यामुळे हे खड्डे समजणार नाहीत. त्यामुळे या खड्डय़ांत बुडून भाविकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने आम्ही महसूल अधिकाऱयांना विनंती केली होती की, वाळूचोरी तुम्ही थांबवू शकला नाही तर किमान उजनीचे पाणी चंद्रभागेत येण्याआधी हे मोठमोठे खड्डे तरी बुजवून घ्या. यावर अधिकाऱयांनी आम्हाला उत्तर दिले की, पंढरपूर नगरपरिषदेला यासंदर्भात पत्र देऊनही त्यांनी जेसीबी पाठवला नाही. अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे संबंधित विभागाकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे या प्रश्नांबाबत संबंधितांना गांभीर्यच नसल्याचे दिसून येते, असा आरोपही त्यांनी केला.
यापुढे चंद्रभागेतील या खड्डय़ांमुळे एखादा बळी गेला तर यासाठी संबंधित अधिकाऱयांना जबाबदार ठरकून त्यांच्याकर 302 कलमान्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू. यासंदर्भात लवकरच निवेदनही देऊ, अशी माहिती गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List