“मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीच केला नाही”, अजित पवारांच्या आरोपांना शरद पवारांचं उत्तर

“मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीच केला नाही”, अजित पवारांच्या आरोपांना शरद पवारांचं उत्तर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. मी शरद प वारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. पण केवळ मी साहेबांचा मुलगा नाही, म्हणून मला संधी मिळाली नाही, हा कोणता न्याय? असा सवाल अजित पवार यांनी शिरूरच्या सभेत बोलताना केला होता. या आरोपांना शरद पवार यांनी आता प्रत्युत्तर दिले असून त्यांची ओरड निर्थक असल्याचे म्हटले आहे. ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी अजित पवारांच्या आरोपांना उत्तर दिले.

अजित पवार माझ्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत आहेत. ‘मी शरद पवारांच्या पोटी जन्माला आलो असतो तर..’, अशी भाषा करत आहेत. पण कुटुंबप्रमुख म्हणून मी मुलगी सुप्रिया आणि पुतण्यात अजित यांच्यामध्ये कधीही भेद केला नाही, असे शरद पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, अजित पवार यांना पक्षाने काय कमी दिले? एक नव्हे, दोन नव्हे, तर तीन वेळा उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विधिमंडळातील गटनेतेपद अजित पवार याला केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद दिले. हे सर्व दिल्यानंतर अजून काय हवे होते? विधिमंडळ पक्षनेते म्हणून अजित पवारांकडे राज्याची सूत्र होती. एवढे सारे होऊनही पक्षात मला काम करण्याची संधी मिळाली नाही ही ओरड निरर्थक आहे.

सुप्रिया सुळे चारदा लोकसभेवर निवडून आल्या असून त्यांचे कार्यक्षेत्र लोकसभेपुरतेच सीमित होते. आता ती लोकसभेत पक्षाची गटनेता आहे. ती दिल्लीच्या राजकारणात आहे. परंतु तिला कधीही सत्तापद दिले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;