पतसंस्थेची फसवणूक; व्यापाऱयाला सक्तमजुरीची शिक्षा, चार लाखांचा दंड

पतसंस्थेची फसवणूक; व्यापाऱयाला सक्तमजुरीची शिक्षा, चार लाखांचा दंड

थकबाकीपोटी पतसंस्थेला दिलेला चेक न वटल्याने संगमनेरातील व्यापारी रुपेश सुभाष वर्मा यांना दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी आणि 4 लाख रुपये दंडाची शिक्षा दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम. जे. गायकवाड यांनी ठोठावली.

संगमनेर बाजारपेठेमधील सुवर्णकार व्यापारी रुपेश वर्मा याने संगमनेर येथील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. ते थकीत झाल्यानंतर रुपेश वर्मा यांनी थकीत रक्कम देण्यापोटी पतसंस्थेला 2 लाख 48 हजार 80 रुपयांचा धनादेश दिला. दिलेला चेक न वटता परत आल्यानंतर पतसंस्थेने संगमनेर न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.

दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम. जे. गायकवाड यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. फिर्यादी संस्थेचे वकील राजेश भुतडा यांनी न्यायालयासमोर पतसंस्थेची बाजू मांडत संस्थेतर्फे मॅनेजर गजाजन ठाकरे यांची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविली. फिर्यादी व आरोपीचे वकील यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. आरोपी रुपेश सुभाष वर्मा याला दोषी ठरवत न्यायाधीश गायकवाड यांनी शिक्षा सुनावली. पतसंस्थेचे वकील राजेश भुतडा यांना वकील स्वप्नील एम. उपरे यांनी सहाय्य केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;