गणेशमूर्ती करणाऱ्या 130 कारखान्यांना नोटिसा, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नगर महापालिकेची मोहीम

गणेशमूर्ती करणाऱ्या 130 कारखान्यांना नोटिसा, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नगर महापालिकेची मोहीम

पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक पातळीवर वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने गणेश मूर्ती तयार करणाऱ्या नगर जिल्ह्यातील 130 कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एकीकडे व्यवसाय कसा चालवायचा, असा प्रश्न उभा असतानाच पर्यावरणासंबंधी कारवाई सुरू झाल्यामुळे कारखानदार अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, नगर जिल्हा गणेश मूर्तिकार संघटनेने याचा निषेध करत ही नोटीस अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.

शाडूच्या मूर्ती व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करण्याचे काम वर्षभर सुरू असते. नगर जिल्ह्यामध्ये अनेक कारखाने आहेत. आता तालुकास्तरावर अशा प्रकारचे कारखाने होऊ लागले आहेत. सर्वाधिक कारखाने नगर शहरात आहेत. नगरच्या गणपतींना इतर ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर मागणी असते. आता मूर्ती बनवताना पर्यावरणासंबंधीचे नियम व अटी यांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासकीय पातळीवर देण्यात आल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार न करता पर्यावरणपूरक मूर्ती तयार कराव्यात. तीन दिवसांच्या आत गणेश मूर्ती बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱया पीओपी साहित्याची विल्हेवाट लावावी. पीओपीचा साठा आढळून आल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने गणेश मूर्ती बनवणाऱया कारखानदारांना दिला आहे. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याबाबत व पीओपीच्या मूर्तींबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या पत्राच्या आधारे महापालिकेने शहरातील 130 कारखानदारांना नोटिसा बजावल्या आहेत.

z पीओपी मूर्तीच्या उत्पादन व विक्रीवर कोणतीही बंदी नसल्याचे सरकारने मागील वर्षी विधान परिषदेत स्पष्ट केले आहे. तरीही चुकीचा अर्थ काढत या नोटिसा बजावण्यात आल्याचा दावा नगर जिल्हा गणेश मूर्तिकार संघटनेने केला आहे. चुकीचा संदर्भ घेऊन शहरातील व जिह्यातील कुटुंबांना बेरोजगार करू नये, असे मत संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत निंबाळकर यांनी म्हटले आहे.

z एकीकडे कारागीर मिळत नाही. दुसरीकडे आहे त्या किमतीला मूर्ती विकल्या जात नाहीत. कधी-कधी त्या कमी भावाने अथवा अत्यंत कमी दराने विक्री कराव्या लागतात. अशी परिस्थिती गेल्या चार-पाच वर्षांपासून पाहायला मिळत आहे. त्यामुळे कारखानदारांना या सर्व नियमांचे पालन करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे पर्यावरणाचा ऱहास होऊ नये, यासाठी प्रशासनाने जे नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्याचे उल्लंघन होऊ नये म्हणून महानगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नगर शहरातील गणेश मूर्ती बनवणाऱया कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;