नाशिकच्या जागेबाबत विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघून गेले?; संकेत काय?

नाशिकच्या जागेबाबत विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघून गेले?; संकेत काय?

महायुतीने निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू केला असला तरी महायुतीत अजूनही सर्व काही अलबेल नाही. अनेक जागांवर अद्यापही महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घेतलेला नाही. नाशिकच्या जागेचाही तिढा कायम आहे. शिंदे गटाची ही जागा असून या जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दावा केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनाही राष्ट्रवादीने ही जागा लढवावी असे वाटत आहे. त्यासाठी छगन भुजबळ यांचं नावही दिल्लीतून सूचवण्यात आलं होतं. पण भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतरही नाशिकचा तिढा काही सुटलेला नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाशिकच्या जागेबाबत विचारण्यात आलं. त्यावर काहीही न बोलता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघून गेले. त्यामुळे नाशिकमध्ये काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. पण नाशिकच्या प्रश्नावर बोलणं त्यांनी टाळलं. यावेळी त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधकांना फैलावर घेतलं. विरोधक इतर राज्यात जिंकतात तेव्हा ईव्हीएम बरोबर असतं. मात्र, जेव्हा हरतात तेव्हा ईव्हीएमवर आक्षेप घेतला जातो. विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे. आता तर सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घेतला जात आहे. यापूर्वीही सुप्रीम कोर्टाला सल्ले देत होते. न्यायालयाने आमची कोणतीही मागणी पूर्ण करावी अट्टाहास लोकशाहीला घातक आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सुडबुद्धीने कारवाई करत नाही

मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याचा निर्णय लोकांनी घेतलाय. लोक घरी बसणाऱ्यांना नाही तर काम करणारांना मतदान करतील. आम्ही सुडबुद्धीने कारवाई करत नाही. त्यांनी अनेक लोकांवर सूडबुद्धीने कारवाई केली. सरकार वाचवण्यासाठी आणखी काही लोकांना जेलमध्ये टाकणार होते, असा गौप्यस्फोटही मुख्यमंत्र्यांनी केला.

संजय राऊत पळपुटे

संजय राऊत सारख्या पळकुट्या लोकांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार काय? एकनाथ शिंदे जे काही करतो ते खुलेपणाने करतो. जो निर्णय घेतो तो धाडसाने घेतो. मला कुठलीही भिती नाही. दबावापोटी नाही तर शिवसेना वाचवण्यासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. खुर्ची मिळवण्यासाठी तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली. ये जनता है सब जानती है, असा हल्लाच त्यांनी राऊतांवर चढवला.

जोपर्यंत चंद्रसूर्य आहे…

काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. पण त्यांना गरीबी हटवता आली नाही. गरीब हटला. पण गरीबी गेली नाही. मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजना गरीबांसाठी आणली. ती सर्व धर्मियांची आहे. मुस्लिमांना देखील या योजनेचा फायदा मिळाला. पण विरोधक केवळ व्होट बँकेचं राजकारण करत आहेत. संविधान बदलणार असल्याचा कांगावा करत आहेत. पण जोपर्यंत चंद्रसूर्य आहे, तोपर्यंत बाबासाहेबाचं संविधान कायम राहणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कार घुसवण्याचा प्रयत्न; कुठे घडला हा प्रकार, तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कार घुसवण्याचा प्रयत्न; कुठे घडला हा प्रकार, तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात
Lok Sabha Election 2024 ची सगळीकडे धामधूम सुरु आहे. काल तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह मराठवाड्यात मतदान...
कांद्याचा वांदा, निर्यात बंदी रद्द झाल्यानंतर अडचणी सुटेना, कांद्याचे 400 कंटनेर अडकले
दोन कोटींच्या हिऱ्यांची चोरी, मुंबई पोलिसांनी आरोपीच्या अशा बांधल्या मुसक्या
त्यांना मत देऊ नका, अभिनेत्री रेणुका शहाणे संतापल्या, पोस्ट तुफान व्हायरल
राजकारणातील मोठी बातमी, राष्ट्रवादी गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? शरद पवार यांचा मुलाखतीत दावा
Maharashtra Political News live : पुण्यात आज महायुतीची महत्वाची बैठक
स्कॉटलंड, युगांडाचेही संघ जाहीर; स्कॉटलंडचा सहाव्यांदा सहभाग, युगांडाचे पदार्पण