कोकणात एक फुल, दोन हाफ फरक पडणार नाही… भास्कर जाधव यांनी सांगितले कारण

कोकणात एक फुल, दोन हाफ फरक पडणार नाही… भास्कर जाधव यांनी सांगितले कारण

सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेना उबाठाचा विजय निश्चित आहे. कारण कोकण उद्धव ठाकरे यांचच आहे. समोर कोण उभे आहे, हे बघण्याची गरज नाही. महायुतीने ऐनवेळी उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर न बोललेले बरे. त्यांच्याकडे उमेदवार देखील नव्हता. विनायक राऊत यांच्या तोडीचा महायुतीकडे उमेदवार नाही. उभे राहायला कोण तयार नव्हते त्यामुळे आम्ही आता तेथील आवाहन मानत नाही. कोकणात त्यांच्या प्रचाराला एक फुल दोन हाफ आले आहे. त्यामुळे काय फरक पडणार नाही. शिवसेना आणि कोकण यांचे अतूट नातं आहे. शिवसेनाला विजय ठेवण्याच काम कोकणाने केले, असे शिवसेना उबाठा पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी सांगितले. ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना त्यांनी कोकणात शिवसेना उबाठाचे वर्चस्व कायम राहणार असल्याचे सांगितले.

त्यावेळीच औपचारिक विजय

विनायक राऊत यांचा फॉर्म भरला तेव्हा सांगितलं होते 4 जून निकालाची तारीख आहे. पण त्यांचा औपचारिक विजय झाला आहे. फक्त लीड किती मिळणार आहे, हे 4 जून रोजी दिसणार आहे. त्यांची लीड लाखांमध्ये असणार आहे. आज कोकणातील जनता दुःखी आहे. कारण जो धनुष्यबाण आहे तो धनुष्य बाण चोरीला गेला आहे. त्याला पर्याय म्हणून मशाल असणार आहे.

मनसेसंदर्भात बोलताना विनायक राऊत म्हणाले, जे माझ्यावर टीका करता त्यांचा वरचा मजला रिकामी आहे. त्यांनी बोलू नये. मी राज ठाकरे यांच्यावर कधीही टीका केली नाही. उलट वेळ पडली तेव्हा राज ठाकरे यांचे समर्थन मी केलेलं आहे. ज्यांचा वरचा मजला रिकामा आहे, त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही.

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार

उद्धव ठाकरे यांचा मुलगा म्हणून आदित्य ठाकरे यांची वेदना मी जवळून पाहिली आहे. गद्दारांच्या 40 मतदार संघात जाऊन त्यांनी सभा घेतल्या आहे. गद्दाराला त्यांची जागा दाखवली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी तयार का होऊ नये? ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री होईपर्यत मी कायम सोबत असेल, असे म्हटले होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे अशी माझी ईच्छा आहे. पुन्हा 2024 साली त्यांना सन्मान करायचा आहे, पण उद्धव साहेबांच म्हणणं आहे की शिवसैनिक मुख्यमंत्री करायचा आहे तर माझ म्हणणं आहे, शिवसैनिक म्हणून 2024 साली आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री करावे. माझ्यासारखे शिवसैनिक कायम त्यांचे आदेश पाळत राहतील.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केलेत. पहिलं म्हणजे 2019 ला स्थापन झालेली महाविकासआघाडी 2014 मध्येच बनवण्याचं ध्येय...
पुढारी कसे न लाजता मत मागतात, तसंच काहीसं…; अभिनेते मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
Lok Sabha Election 2024 : मुंबईतलं भाषिक गणित काय सांगतं? नेमकं राजकीय समीकरण काय?
Health : रोज सकाळी ब्रेड खात असाल तर सावधान, शरीराचं भयंकर नुकसान
जालना जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरुद्ध महसूल विभागाची कारवाई, कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त
सगेसोयर्‍याची अंमलबजावणी न केल्यास समाजाला निवडणुकीत उतरविणार- मनोज जरांगे पाटील
कान्सच्या कार्पेटवर दिसणार मराठी अभिनेत्रीचा स्वॅग, वाचा बातमी