थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कार घुसवण्याचा प्रयत्न; कुठे घडला हा प्रकार, तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कार घुसवण्याचा प्रयत्न; कुठे घडला हा प्रकार, तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lok Sabha Election 2024 ची सगळीकडे धामधूम सुरु आहे. काल तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह मराठवाड्यात मतदान झाले. दरम्यान मुंबईत एक मोठी घडामोड घडली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात एका तरुणाने कार घुसविण्याचा आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ या तरुणाला ताब्यात घेतले. त्याने हा प्रकार का केला, याचा तपास पोलीस करत आहेत.

नेमकं घडलं तरी काय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११:१५ च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा वरळीच्या दिशेने जात होता. त्यावेळी एक कारचालक त्याची गाडी भरधाव चालवत लेन क्रमांक ७ मध्ये आला. याच मार्गिकेवरुन मुख्यमंत्र्यांचा ताफा जात होता. पोलिसांनी कार चालकाला त्वरीत लेन ६ मध्ये जाण्याचा इशारा केला. पण हा तरुण ऐकायला तयार नव्हता. त्याने कार बाजूला न घेता. पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. हा तरुण कार तशीच सूसाट दामटत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होता.
कार ताफ्याच्या मागोमाग घुसवत तोदेखील वरळीच्या दिशेने जाऊ लागला.

कारचालकावर गुन्हा दाखल

पोलिसांनी वरळी वाहतूक विभागाच्या मदतीने त्याला थांबविले आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी केली जात आहे. वांद्रे-वरळी सी-लिंक येथे रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे कार घेऊन निघालेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणाचे शुभमकुमार जगदीश कुमार असं नाव आहे. हा ३० वर्षांचा तरुण माउंट मेरी परिसर, वांद्रे पश्चिम येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कारण तरी काय

पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत या तरुणाला ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करण्यापासून रोखले. पोलिसांनी वाहतूक शाखेच्या मदतीने त्याला थांबविले. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या तरुणाने हा प्रकार का केला हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहे. इशारा देऊन हा तरुण न थांबल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरु केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केलेत. पहिलं म्हणजे 2019 ला स्थापन झालेली महाविकासआघाडी 2014 मध्येच बनवण्याचं ध्येय...
पुढारी कसे न लाजता मत मागतात, तसंच काहीसं…; अभिनेते मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
Lok Sabha Election 2024 : मुंबईतलं भाषिक गणित काय सांगतं? नेमकं राजकीय समीकरण काय?
Health : रोज सकाळी ब्रेड खात असाल तर सावधान, शरीराचं भयंकर नुकसान
जालना जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरुद्ध महसूल विभागाची कारवाई, कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त
सगेसोयर्‍याची अंमलबजावणी न केल्यास समाजाला निवडणुकीत उतरविणार- मनोज जरांगे पाटील
कान्सच्या कार्पेटवर दिसणार मराठी अभिनेत्रीचा स्वॅग, वाचा बातमी