सोलापूर जिह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा

सोलापूर जिह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा

सोलापूरसह जिह्याला आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून जिह्यात वाढत्या तापमानाबरोबरच अवकाळी पाऊस पडत आहे. आज सोलापूर, पंढरपूर, मोहोळ, अकलूज, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट परिसराला अवकाळी पावसाने तडाखा दिला.

दिवसभर उकाडय़ाने हैराण झालेल्या सोलापूरकरांना रात्री आठच्या सुमारास पडलेल्या अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. ग्रामीण भागात सातच्या सुमारास  पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. दरम्यान, आंबा, द्राक्ष, कलिंगड, खरबूज या फळ उत्पादक शेतकऱयांबरोबरच मोठय़ा प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. चार दिवसांपूर्वी अवघ्या अर्धा तासात झालेल्या पावसाने ओढय़ा-नाल्यांना पूर आला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;