अन् भर सभेत रोहित पवार यांना अश्रू अनावर, बारामतीच्या सांगता सभेत चित्र; विरोधकांचा घेतला समाचार

अन् भर सभेत रोहित पवार यांना अश्रू अनावर, बारामतीच्या सांगता सभेत चित्र; विरोधकांचा घेतला समाचार

ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, त्यानंतर टीक्हीकर बातम्या झळकत होत्या. शरद पकार साहेब तसेच आम्ही टीक्हीसमोर बसलो होतो. मात्र, त्यांच्या मनातील भाकना बरंच काही सांगून जात होत्या. मात्र त्यांनी न डगमगता काळजी करू नका, असे सांगितलं होतं. तसेच जोपर्यंत लढण्यासाठी नकी पिढी तयार होत नाही, तोपर्यंत मी डोळे मिटणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते, असे रोहित पकार यांनी सभेमध्ये सांगताच एकच सन्नाटा पसरला. हा प्रसंग सांगतानाच रोहित पकार यांच्या डोळय़ांमध्ये अश्रू आले.

बारामती लोकसभेची सांगता सभा झाली. यावेळी आमदार रोहित पवार बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, माजी मंत्री राजेश टोपे, अनिल देशमुख व इतर पदाधिकरी उपस्थित होते.

रोहित पवार म्हणाले, तुम्ही केलेले कष्ट आम्ही कधीही विसरणार नाही. तुम्ही फक्त लढा म्हणा, आम्ही लढायला तयार आहे. 4 जून नंतर आमचं सरकार येणार आहे. त्यामुळे खोटे आश्वासन देणाऱयांपासून सावध राहा. भाजपच्या फोडा आणि राज्य करा, या नीतीला मतदार ओळखून आहेत. नेते बोलत नाही. फक्त आश्वासन देतात; परंतु बारामतीच्या जनतेला माहिती आहे, कोणामुळे बारामतीचा विकास झाला, ही सांगायची गरज नाही असे रोहित पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;