23 वर्षांत इतका बदलला ‘कभी खुशी कभी गम’मधील ‘लड्डू’; ओळखणंच कठीण
करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम' हा बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये शाहरुख खान, काजोल, जया बच्चन, अमिताभ बच्चन, करीना कपूर हृतिक रोशन यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय चित्रपटातील बालकलाकारांनीही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं.
या चित्रपटात लहानपणीच्या करीनाची (पू) भूमिका अभिनेत्री मालविका राजने साकारली होती. तर हृतिकच्या (लड्डू) लहानपणीची भूमिका कविश मजुमदारने साकारली होती. लड्डूची भूमिका प्रेक्षकांना फार आवडली होती. तोच लड्डू आता मोठा झाला आहे.
'कभी खुशी कभी गम'मधील या 'लड्डू'ला आता ओळखणंच कठीण आहे. कविशने 'पार्टनर', 'गोरी तेरे प्यार में', 'मैं तेरा हिरो' आणि 'बँकचोर' या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. इन्स्टाग्रामवर तो फारसा सक्रिय नसतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List