हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक

हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक

देशातील हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या एका मौलवीला सूरत पोलिसांनी अटक केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान हा कट उधळला गेला आहे. देशातील हिंदुत्ववादी नेते आणि भाजप नेत्यांना जिवे मारण्याची धमकी देणे आणि हत्येचा कट रचण्याच्या आरोपावरून या मौलवीला अटक करण्यात आली आहे.

हा मौलवी 27 वर्षांचा असून मोहम्मद शोहेल उर्फ मौलवी अबूबकर टीमोल याला सूरत पोलिसांनी कठौर भागातून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याने चौकशीदरम्यान या कटाचा खुलासा केला. भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा, भाजप आमदार टी. राजा सिंह, हिंदुत्ववादी नेता उपदेश राणा हे त्याच्या निशाण्यावर होते. अबुबकर हा मौलवी असण्यासोबत अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होता.

हिंदू सनातन संघाचा अध्यक्ष उपदेश राणा याला मारण्यासाठी 1 कोटी रुपयांची सुपारीही त्याने दिली होती. त्याने राणा याला नेपाळ आणि पाकिस्तानच्या कट्टरतावादी व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये सहभागी करत हत्येची धमकी दिली होती. त्याखेरीज नुपूर शर्मा आणि टी. राजा सिंह यांच्याविरुद्धही तो कट रचत होता, अशी माहिती त्याने दिली आहे.

मौलवी हा सूरत येथील एका धागे निर्मितीच्या कारखान्यात काम करत होता. तो कठौर या गावचा रहिवासी आहे. त्याच्या कट्टरतावादी विचारांमुळे तो पोलिसांच्या नजरेत आला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली होती. तो धार्मिक भावना दुखावतील अशा पोस्टही करत होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अद्यापही त्याच्याकडून आणखी खुलासे होणं बाकी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;