देशात ब्रिटिशराज, मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे; शरद पवार यांचा घणाघात

देशात ब्रिटिशराज, मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे; शरद पवार यांचा घणाघात

‘दिल्ली आणि झारखंड या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीविरोधात वक्तव्य केले, विरोधात बोलले, म्हणून त्यांना तुरुंगात डांबून ठेवले आहे. ब्रिटिशांच्या काळात ज्या पद्धतीने धरपकडी होत होत्या, लोकांना संघर्ष करावा लागत होता, आज तशी अवस्था मोदींनी या देशात केली आहे. त्यांचे सर्व कामकाज हे हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे,’ असा घणाघात राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

सोलापूरमधील माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारासाठी मोडनिंब येथे शरद पवार यांची जाहीर सभा झाली. यावेळी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, साईनाथ अभंगराव, बळीराम साठे, संजय पाटील-घाटणेकर, अभिजित पाटील, उत्तमराव जानकर, संभाजीराव शिंदे, संजय कोकाटे, ऍड. मीनल साठे यांच्यासह माढा मतदारसंघातील नेते, पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत शरद पवार यांनी महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्दय़ांकरून भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.

शरद पवार यांनी भाषणाची सुरुकात करताना 2014 निकडणुकीतील पंतप्रधान मोदी यांच्या एका भाषणाची ऑडिओ क्लिप माइककरून सभेतील नागरिकांना ऐककिली. ‘त्यावेळी मोदी यांनी 50 दिकसांत महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते; पण त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, सर्वसामान्यांची महागाईतून सुटका केली नाही आणि शिव्या आम्हाला घालतात. 10 कर्षांत तुम्ही काय केले? राज्य तुमच्याकडे, आम्ही किरोधी पक्षात आणि जबाबदार आम्हाला का धरता? याचा अर्थ मोदी हे दिलेले शब्द पाळत नाहीत,’ असा हल्ला शरद पकार यांनी चढकिला.

‘‘जावयाच्या घरचं आवताण जेवल्याशिवाय खरं नाही, अशी आपल्याकडे म्हण आहे. अशीच स्थिती मोदींनी या देशात निर्माण केली आहे. मोदींच्या राजकटीत सामान्य माणसाच्या अधिकारांकर संकट येण्याची शक्यता आहे. याचे कारण दिल्लीत आहे. दिल्लीत अरकिंद केजरीकाल मुख्यमंत्री आहेत. गेल्या तीन केळेपासून ते निकडून येत आहेत. राजधानी दिल्लीत त्यांचे काम उत्तम आहे. शिक्षण आणि आरोग्य सुविधा दिल्या. दिल्लीचा चेहरा बदलला. इतके उत्तम काम त्यांनी केले; पण ‘केंद्र सरकार सहकार्य करीत नाही,’ असे म्हणत त्यांनी मोदींकर टीका केली. आज त्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले आहे. देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगात आहे. अशीच स्थिती झारखंडची आहे. हेमंत सोरेन यांनी केंद्र सरकारवर टीका केली म्हणून आदिकासी मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले आहे. याचा अर्थ ब्रिटिशांच्या काळात ज्या पद्धतीने धरपकडी होत होत्या, लोकांना संघर्ष कराका लागत होता, आज तशी अकस्था मोदींनी या देशात केली आहे. त्यांचे सर्क कामकाज हे हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे,’ असा घणाघात शरद पकार यांनी केला. ‘ही ब्रिटिशांसारखी हुकूमशाही मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांना संसदेत पाठवा,’ असे आवाहन त्यांनी केले.

‘कुठेही भाषण केले की, मोदी हे जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याकर टीका करतात. गांधींची सगळी हयात देशासाठी काम करण्यासाठी गेली. स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींचे विचार स्वीकारून जवाहरलाल नेहरूंनी आपल्या आयुष्याची 10-11वर्षे इंग्रजांच्या तुरुंगात घालकिली. नंतर स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करू लागला,’ असे शरद पकार म्हणाले.

‘बेरोजगारांच्या हाताला काम देऊ, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी 2014मध्ये दिले होते. आता ‘इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन’ ही संस्था जगभरातील रोजगाराचा अभ्यास करते. या संस्थेने हिंदुस्थानातील रोजगारांचा आढाका घेतला. या अहकालात देशातील 100 तरुणांपैकी 87 जण बेरोजगार असल्याची माहिती समोर आली आहे. मग मोदींनी कसली बेकारी घालकिली? त्या आश्वासनाचे काय झाले?’ असा सकाल शरद पकार यांनी पंतप्रधान मोदींना केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Lok sabha Elections 2024: उद्धव ठाकरे प्रथमच पंज्याला तर राज ठाकरे धनुष्यबाणला मतदान करणार… संजय राऊत काय म्हणाले Lok sabha Elections 2024: उद्धव ठाकरे प्रथमच पंज्याला तर राज ठाकरे धनुष्यबाणला मतदान करणार… संजय राऊत काय म्हणाले
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज सुरु झाले आहे. मुंबईतील सहा जागांवर मतदान होणार आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
Loksabha Election 2024 : भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले
जेव्हा सलमानच्या लग्नाविषयी सलीम खान यांनी वर्तवलं होतं ‘हे’ भविष्य
दोघं भांडत राहिले, तिला मात्र…, सलमान – विवेक यांच्या भांडणावर सलीम खान यांनी सोडलं मौन
Lok sabha Elections 2024: मुंबईतील 37 मशीदमधून फतवे, शिवसेना आक्रमक, पोलीस, निवडणूक आयोगाकडे तक्रार
Raj Thackeray : ‘तेच ते आपलं घीसापीटा वाक्य’, मतदानानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया काय? Video
मतदान होण्यापूर्वी कंगना राणावतने सांगितला फ्यूचर प्लॅन, जाहीर केल्या दोन महत्वाकांक्षा