मिंध्यांना दाखवला वसमतकरांनी हिसका! सभेकडे पाठ फिरवली

मिंध्यांना दाखवला वसमतकरांनी हिसका! सभेकडे पाठ फिरवली

हिंगोली मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या मिंध्यांना वसमतकरांनी चांगलाच हिसका दाखवला. वसमतकरांनी सभेकडे पाठ फिरवल्याने महायुतीच्या पदाधिकार्‍यांना लोक गोळा करण्यासाठी वणवण करावी लागली. लोकच नसल्याने मिंधे तब्बल दोन तास ताटकळले. शेवटी मिंध्यांना अजितदादा गटाचे आमदार राजू नवघरे यांच्या घरी पाहुणचारासाठी जावे लागले.

वसमत येथे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहाळीकर यांच्या प्रचारासाठी आज सकाळी 10 वाजता मिंध्यांची सभा ठेवण्यात आली होती. सभेसाठी मिंध्यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. परंतु सभास्थळी कोणीच नव्हते. त्यामुळे मिंधे आमदार राजू नवघरे यांच्या घरी चहापानासाठी गेले. लोक येण्याची वाट बघत तब्बल दोन तास त्यांना तेथेच ताटकळत बसावे लागले. मुख्यमंत्री आले पण लोकच आले नसल्याने महायुतीच्या पदाधिकार्‍यांची पाचावर धारण बसली. सभेसाठी गल्लीबोळातून माणसे आणण्यासाठी या पदाधिकार्‍यांनी वणवण केली. पण अगदी बोटावर मोजण्याएवढेच लोक आले. उपमुख्यमंत्री अजित पवार येणार होते पण त्यांनी ऐनवेळी दांडी मारली. भाजपचे खासदार अशोक चव्हाण हे मराठा आंदोलकांच्या धास्तीने फिरकले नाहीत. गेलाबाजार भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनीही पाठ फिरवली.

लोक येत नसल्याचे पाहून शेवटी सभा सुरू करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार राजू नवघरे यांनी मिंध्यांच्या तोंडावरच युतीधर्मावरून आकांडतांडव केले. हळद संशोधन केंद्रावरूनही त्यांनी राजीनामा देण्याची धमकी दिली. लावणीफेम हेमंत पाटील यांच्याबद्दलही त्यांनी तक्रारींचा सूर लावला. हे पाहून दुसरे गद्दार आमदार संतोष बांगर यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु आमदार नवघरे यांनी तुम्ही मध्ये बोलू नका, असे त्यांनाही सुनावले. आमदार राजू नवघरे यांच्या आरोपांवर चकार शब्दही न बोलता तुमची सगळी कामे मी करेन, अशी मखलाशी करत दुसर्‍या सभेला जायचे, असे म्हणत मिंध्यांनी सभेतून काढता पाय घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Lok sabha Elections 2024: उद्धव ठाकरे प्रथमच पंज्याला तर राज ठाकरे धनुष्यबाणला मतदान करणार… संजय राऊत काय म्हणाले Lok sabha Elections 2024: उद्धव ठाकरे प्रथमच पंज्याला तर राज ठाकरे धनुष्यबाणला मतदान करणार… संजय राऊत काय म्हणाले
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज सुरु झाले आहे. मुंबईतील सहा जागांवर मतदान होणार आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
Loksabha Election 2024 : भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले
जेव्हा सलमानच्या लग्नाविषयी सलीम खान यांनी वर्तवलं होतं ‘हे’ भविष्य
दोघं भांडत राहिले, तिला मात्र…, सलमान – विवेक यांच्या भांडणावर सलीम खान यांनी सोडलं मौन
Lok sabha Elections 2024: मुंबईतील 37 मशीदमधून फतवे, शिवसेना आक्रमक, पोलीस, निवडणूक आयोगाकडे तक्रार
Raj Thackeray : ‘तेच ते आपलं घीसापीटा वाक्य’, मतदानानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया काय? Video
मतदान होण्यापूर्वी कंगना राणावतने सांगितला फ्यूचर प्लॅन, जाहीर केल्या दोन महत्वाकांक्षा