Category
महापालिका प्रशासन
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

कचरा व्यवस्थापनात महापालिका अपयशी; सुनेत्रा पवार यांची प्रशासनावर नाराजी

कचरा व्यवस्थापनात महापालिका अपयशी; सुनेत्रा पवार यांची प्रशासनावर नाराजी पिंपरी-चिंचवड : शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या नियोजनात अनेक त्रुटी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प गेल्या सहा महिन्यांपासून बंद का आहे, मोशी दुर्घटनेनंतर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, मोशी कचरा डेपोची क्षमता संपल्यानंतर पर्यायी जागेचे नियोजन झाले आहे का, असे सवाल त्यांनी प्रशासनाला केले. कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नाकडे आता अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

कासारवाडीचा जलतरण तलाव पाच महिन्यांनंतर सुरू; मात्र सुविधांचा अभाव कायम!

कासारवाडीचा जलतरण तलाव पाच महिन्यांनंतर सुरू; मात्र सुविधांचा अभाव कायम! पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या पाणीकपातीमुळे गेल्या जून महिन्यापासून बंद असलेला कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव तब्बल पाच महिन्यांनंतर सोमवार (दि. २३ नोव्हेंबर) पासून पुन्हा नागरिकांसाठी खुला होणार आहे. मात्र, तलाव सुरू होण्यापूर्वीच तेथील असुविधा, अस्वच्छता आणि सुरक्षेच्या प्रश्नांमुळे महापालिका प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाच महिन्यांचा कालावधी मिळूनही मूलभूत सुविधांची कामे पूर्ण झाली नसल्याने जलतरणपटूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
Read More...

Advertisement