रुग्णालयातील दिलीप वळसे-पाटील यांची शिवाजीराव आढळराव पाटलांकडून विचारपूस!

महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांचा प्रचार धडक्यात

रुग्णालयातील दिलीप वळसे-पाटील यांची शिवाजीराव आढळराव पाटलांकडून विचारपूस!

शिरूरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात लोकसभेची निवडणुक होत आहे. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांनी आपला प्रचार धडक्यात सुरू केला आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे देखील चांगलचे सक्रीय झाले आहेत. अशातच आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आढळराव पाटलांनी भेट घेऊन तब्येची विचारपुर केली आहे. काही दिवसांपुर्वी वळसे पाटलांचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांची आढळराव पाटलांनी भेट घेतली आहे.

पुणे : शिरूरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात लोकसभेची निवडणुक होत आहे. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांनी आपला प्रचार धडक्यात सुरू केला आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे देखील चांगलचे सक्रीय झाले आहेत. अशातच आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आढळराव पाटलांनी भेट घेऊन तब्येची विचारपुर केली आहे. काही दिवसांपुर्वी वळसे पाटलांचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांची आढळराव पाटलांनी भेट घेतली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी गटातील आमदारांनी आढळरावांच्या प्रचारासाठी चांगल्याच बैठका सुरू केल्या आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून डाव्या मांडीचे हाड व डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे मंत्री दिलीप वळसे पाटील दवाखान्यात उपचार घेत होते. त्यानंतर तब्बल पंधरा दिवसानंतर त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. अशातच आता शिवाजीराव आढळराव पाटलांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.

यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, “महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची विचारपूस करण्यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आपणा सर्वांना हे सांगताना अत्यंत समाधान वाटत आहे की, नामदार साहेबांची प्रकृती हळू हळू सुधारत आहे आणि लवकरच सक्रिय होऊन ते पुनः सगळा कार्यभार आपल्या हाती घेणार आहेत. जनतेच्या आशिर्वादाने हे सगळं लवकरच शक्य होईल असा विश्वास साहेबांनी व्यक्त केल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी शिवाजीराव आढळराव पाटलांच्यासोत माजी जिल्हापरिषद सदस्य अरूण गिरे, शिवाजी राजगुरू आदी उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;