मंचरच्या ग्रामस्थांचा आढळरावांना पाठिंबा, मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार

मंचरच्या ग्रामस्थांचा आढळरावांना पाठिंबा, मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार

शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रत्येक ग्रामस्थाचं मत म्हणजे मंचरच्या विकासाला मत असल्याचा सुर मंचरच्या गावबैठकीत व्यक्त करण्यात आला. आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र असलेल्या आढळराव यांना संपुर्ण पाठिंबा देण्यासाठी मंचर येथील भैरवनाथ गल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत मंचर शहरातील विविध राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी बांधव, शेतकरी इत्यादींनी आढळराव पाटील यांना पाठिंबा देऊन मताधिक्क्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. 

पुणे :  शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रत्येक ग्रामस्थाचं मत म्हणजे मंचरच्या विकासाला मत असल्याचा सुर मंचरच्या गावबैठकीत व्यक्त करण्यात आला. आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र असलेल्या आढळराव यांना संपुर्ण पाठिंबा देण्यासाठी मंचर येथील भैरवनाथ गल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत मंचर शहरातील विविध राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी बांधव, शेतकरी इत्यादींनी आढळराव पाटील यांना पाठिंबा देऊन मताधिक्क्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. 

या बैठकीला सर्वच जातीधर्माच्या ग्रामस्थांनी हजेरी लावली. तर उद्योजक आणि शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा, भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे आदी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब बेंडे म्हणाले की, जो विकास करतो, त्याच्यामागे पाठीमागे ठामपणे उभे राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी आंबेगावचे सुपुत्र आढळराव पाटील यांच्यासारख्या सक्षम नेत्याला निवडून देण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. 

तर अरूण लोंढे म्हणाले की, स्वकर्तृत्वान असलेले आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्याच्या विकासाचा चेहरामोहरा बदलला आहे. रामदास बाणखेले म्हणाले की, आढळराव पाटील यांनी स्वत: खासदार नसतानाही मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून विकास निधी आणल्यामुळे मंचरकर खूश राहणार असल्याचे व्ही. एस. महामुनी, सीताराम लोंडे यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;