पुणे बाजार समितीचा घोटाळेबाज कारभार, वाहन प्रवेश ठेक्यात उत्पन्न ९२ लाख खर्च १०५ कोटी; APMC ला ११ लाख ७६ हजारांचा तोटा

पुणे बाजार समितीचा घोटाळेबाज कारभार, वाहन प्रवेश ठेक्यात उत्पन्न ९२ लाख खर्च १०५ कोटी; APMC ला ११ लाख ७६ हजारांचा तोटा

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाहन प्रवेश ठेक्यातील गोंधळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शेतकरी आणि व्यापार्‍यांकडून वाहन प्रवेश शुल्काच्या नावाखाली सुरू असलेली लूट थांबवण्याऐवजी, बाजार समितीच्या अधिकार्‍यांनी ठेकेदारांच्या बाजूने उभे राहून बाजार समितीला तब्बल ११ लाख ७६ हजार रुपयांचा तोट्यात नेल्याचे समोर आले आहे.

बाजार समितीवर संचालक मंडळ येण्यापूर्वी ई निविदेद्वारे टेंडर दिले असता बाजार समितीला खर्च वजा जाता निव्वळ ६७ लाख रुपयांचा वार्षिक फायदा झाला होता. संचालक मंडळ नसताना नफा मिळवणारी बाजार समिती आता ठेकेदारांच्या मिलीभगतीमुळे घोटाळ्याच्या गर्तेत गेली आहे. गेल्या दोन वर्षांत या ठेक्यातून समितीला केवळ ९२ लाख ५५ हजार ६८० रुपये उत्पन्न मिळाले, तर एकूण खर्च तब्बल १ कोटी ५ लाख ३१ हजार ६८० रुपये झाला आहे. म्हणजेच उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त — आणि बाजार समितीला सरळ आर्थिक घोटाळ्याचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पैशावर चालणार्‍या बाजार समितीत, ठेकेदारांची मनमानी कोण थांबवणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.

विभाग प्रमुख घुलेही संशयाच्या भोवर्‍यात

गुळ भुसार विभागाचे माजी प्रमुख प्रशांत गोते यांच्या काळात या ठेक्यातून ५१ लाखांचे उत्पन्न झाले. मात्र, त्यांच्यानंतर आलेल्या कोंडे आणि सध्याचे विभाग प्रमुख के. ऐन. घुले यांच्या काळात उत्पन्न कोसळले. घुले यांच्याकडे वाहन प्रवेश शुल्काची संपूर्ण जबाबदारी असूनही त्यांनी हजेरी तपासणी, वसुली नोंदी आणि ठेकेदाराचे कामकाज तपासले नाही. उलट ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे घुलेही ठेकेदारांच्या आशीर्वादाने काम करत आहेत का? असा सवाल उपस्थित झाला आहे. याबाबत विचारले असता घुले यांनी यावर बोलण्यास नकार दिला.

स्पिंडल वर्ल्डमुळे बाजार समिती संकटात

वाहन प्रवेश शुल्क वसुलीचे काम सध्या स्पिंडल वर्ल्ड या मनुष्यबळ पुरवठा संस्थेकडे आहे. मात्र, या कंपनीचे कर्मचारी कामाऐवजी गेटवर केवळ दिखावा करत असून, आवक नोंदच करत नाहीत. पूर्वीच्या ठेकेदारांच्या तुलनेत सध्याचे कामकाज अत्यंत ढिसाळ असल्याने बाजार समितीला कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला आहे. सदर कामाची ई-निविदा काढण्याबाबत संचालक मंडळापुढे प्रस्ताव ठेवला जाईल. टोल नाक्यांप्रमाणे नंबर स्कॅन होणारी अत्याधुनिक यंत्रणा वापरण्याचा विचार आहे. जास्तीच्या खर्चाबाबत विभाग प्रमुखांकडून स्पष्टीकरण मागवले जाईल. — डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे बाजार समिती

खर्चाचा हिशोब

  • दोन वर्षांतील खर्च
  • मनुष्यबळ पुरवठा निविदा ६० लाख ३१ हजार ६८०
  • रोजंदारी कर्मचारी पगार ४२ लाख
  • स्टेशनरी ३ लाख
  • एकूण खर्च १ कोटी ५ लाख ३१ हजार ६८०
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 30 ऑक्टोबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 30 ऑक्टोबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस...
‘एशियाटिक’चे नवीन सभासद ओळखपत्राच्या प्रतीक्षेत; हजारभर नवे अर्ज, प्रक्रिया पूर्ण कधी होणार?
मनसे पदाधिकाऱ्यांचा आज रंगशारदात मेळावा, राज ठाकरे करणार मार्गदर्शन
हायकोर्टाची मीरा रोड पोलिसांना चपराक, ऑर्केस्ट्रा बारचा परवाना रद्द करण्याचे आदेश स्थगित
सीएसएमटी-कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम सुसाट, धारावीतील रहिवासी प्रकल्पाआड येणारी घरे रिकामी करणार; याचिकाकर्त्यांची हायकोर्टात माहिती
फ्लॅशमॉबच्या माध्यमातून स्ट्रोकबाबत जनजागृती
शेतकरी आंदोलनाचा भडका; नागपुरात रेल रोको, नेते रस्त्यावर झोपले! आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा