'अमोल कोल्हे प्रसिद्धीसाठी काहीही बोलत सुटले'; आढळराव पाटील

'अमोल कोल्हे प्रसिद्धीसाठी काहीही बोलत सुटले'; आढळराव पाटील

गेल्या काही दिवसापासून शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच  मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक ऐवजी शिरूरमधून उमेदवारी देण्याबाबत डोक्यात होतं. मात्र भुजबळांनी नकार दिल्याने त्याठिकाणी शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असा दावा विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. त्यावर आता आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर पलटवार केलाय. 

पुणे : गेल्या काही दिवसापासून शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच  मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक ऐवजी शिरूरमधून उमेदवारी देण्याबाबत डोक्यात होतं. मात्र भुजबळांनी नकार दिल्याने त्याठिकाणी शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असा दावा विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. त्यावर आता आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर पलटवार केलाय. 

महायुतीचे उमेदवार जरी चार पक्षांमध्ये बेडूक उड्या मारून गेले असले तरीसुद्धा पहिल्या पंसतीचे उमेदवार छगन भुजबळ होते. भुजबळांना शिरूरमधून उमेदवारी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात होतं. परंतु भुजबळांनी नकार दिल्याने आढळरावांनी उमेदवारी मिळाली आहे. ज्यांना 2019 मध्ये हिम्मत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात उभे राहून देत होते.  त्यांच्याच वळचळनीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली. असा टोला अमोल कोल्हे यांनी आढळरावांना लगावला. 

अमोल कोल्हे यांनी केलेल्या टिकेला आता आढळरावांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अमोल कोल्हे प्रसिद्धीसाठी काहीही बोलत सुटले आहेत. कोल्हे आणि संजय राऊत हे काही विधान करतात. त्याला काहीही अर्थ नसतो. मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत आहेत तर त्यांची उमेदवारी मुख्यमंत्री कसे जाहीर करणार असा सवाल करत कोल्हे हे आता आपला अज्ञाणपणा बालिशपणा दाखवत आहेत. संजय राऊत यांच्यासोबत राहून त्यांची त्यांना शिकवण मिळाली आहे. राऊतांसारखी त्यांनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये. असा सल्ला देखील आढळरावांनी कोल्हेंना दिला.

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील मला शिरूरमधून निवडणुक लढविण्यासाठी विचारणा केली होती. आता सगळीकडे भाषण करत असतो. त्यामुळे माझा संबंध सगळीकडे येतो. परंतु नाशिकमध्ये मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक जण मला नाशिकमधून उभं राहण्यासाठी विनंती करीत आहेत. कदाचित नाशिकमधून उभा राहिलो तर निवडून पण येईन असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल
सांगली मार्केट यार्डातील रस्ता पावसाळ्यापूर्वीच खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्डय़ात रस्ता, अशी रस्त्याची दयनीय स्थिती मार्केट यार्ड परिसरात...
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया जुलैमध्ये?
पतसंस्थेची फसवणूक; व्यापाऱयाला सक्तमजुरीची शिक्षा, चार लाखांचा दंड
गणेशमूर्ती करणाऱ्या 130 कारखान्यांना नोटिसा, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नगर महापालिकेची मोहीम
नोकरदारांना दिलेल्या कर्जाचे 28 कोटी थकले, वसुलीसाठी सांगली जिल्हा बँकेची विशेष मोहीम
एमसीए प्रेसिडेंट चषक; माटुंगा जिमखान्याला सी आणि डी डिव्हिजनचे जेतेपद
महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांना असुविधांचा फटका, वेण्णालेक ते महाडनाका दरम्यानच्या फुटपाथची दुरवस्था