1 नोव्हेंबरसाठी ‘मोर्चे’बांधणी, आज सर्वपक्षीय बैठक; शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस व डाव्या पक्षांचे नेते उपस्थित राहणार

1 नोव्हेंबरसाठी ‘मोर्चे’बांधणी, आज सर्वपक्षीय बैठक; शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस व डाव्या पक्षांचे नेते उपस्थित राहणार

मतदार यादीतील घोळ दूर करण्यासाठी काहीच कारवाई न करणाऱया निवडणूक आयोगाविरुद्ध मुंबईत 1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या अंतिम नियोजनासाठी उद्या दुपारी साडेबारा वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते तसेच डाव्या पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

1 नोव्हेंबरचा मोर्चा विराट आणि अभूतपूर्व असाच होणार आहे. तो केवळ विरोधी पक्षांचा नाही तर मतदार यादीतील घोळाचा निषेध करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा असणार आहे. मोर्चाचे योग्य नियोजन व्हावे, सर्वांमध्ये समन्वय रहावा, यादृष्टीने उद्याची बैठक बोलवण्यात आली आहे.

संयुक्त पत्रकार परिषद होणार

पक्षपातळीवर आणि संयुक्तरित्या या मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू आहे. उद्याच्या बैठकीत मोर्चाच्या या तयारीचाही आढावा घेण्यात येणार आहे. बैठकीनंतर सर्व नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होईल, अशी माहिती शिवसेना नेते- खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिली.

असा निघणार मोर्चा

संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही जगवण्यासाठी हा सत्याचा मोर्चा निघणार आहे. खोट्या मतदार यादीविरोधातील या मोर्चात सर्व खऱया मतदारांनी सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी 1 नंतर चर्चगेटच्या फॅशन स्ट्रिट येथून हा मोर्चा निघणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दुबार मतदारांना फोडून काढा! राज ठाकरेंचा घणाघात; कल्याण, डोंबिवलीतील साडे चार हजार मतदारांनी मलबार हिलमध्येही मतदान केल्याचा पर्दाफाश दुबार मतदारांना फोडून काढा! राज ठाकरेंचा घणाघात; कल्याण, डोंबिवलीतील साडे चार हजार मतदारांनी मलबार हिलमध्येही मतदान केल्याचा पर्दाफाश
कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडीतील साडे चार हजार मतदारांनी मुंबईतील मलबार हिल मतदारसंघातही मतदान केले आहे, असा पर्दाफाश मनसे...
केरळमध्ये टॅक्सी युनियनची आरेरावी, फिरायला गेलेल्या मुंबईच्या तरूणीने सांगितला भयंकर अनुभव
रत्नागिरीत 3 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, तीन आरोपी ताब्यात
यवतमाळमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात, तीन मुलींसह वडिलांचा मृत्यू
दिल्लीतले प्रदूषण ठरले जीवघेणे, वर्षभरात 17 हजार लोकांचा मृत्यू
आंध्र प्रदेशमधील काशीबुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी, 9 भाविकांचा मृत्यू
अति-दारिद्र्यातून मुक्त होणारं केरळ देशातील पहिलं राज्य बनलं, मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची विधानसभेत घोषणा