11 नोव्हेंबरला मुंबईची आरक्षण सोडत, इच्छुकांची धाकधूक वाढली

11 नोव्हेंबरला मुंबईची आरक्षण सोडत, इच्छुकांची धाकधूक वाढली

मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत 11 नोव्हेंबर रोजी काढली जाणार आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मुंबई पालिकेच्या 227 जागांसाठी ही सोडत काढली जाईल. आरक्षणाच्या निश्चितीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीआधी निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे.

मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपल्यानंतर आतापर्यंत प्रशासक आयुक्तांच्या माध्यमातून पालिकेचा गाढा हाकला जात आहे. त्यामुळे निवडणुका कधी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असतानाच आता आरक्षण सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या आरक्षणात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभागांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील टर्मला नगरसेवक असलेल्या ठिकाणचे आरक्षण कायम राहणार का?, पुरुषांसाठी असलेला वॉर्ड महिलांसाठी आरक्षित होतो का याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

अशी काढणार आरक्षणाची लॉटरी

  • आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्याला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर रोजी प्रस्ताव सादर करणे.
  • आरक्षण सोडतीची जाहीर सूचना 6 नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे. आरक्षणाची सोडत 11 नोव्हेंबर 2025 रोजी घेणे.
  • सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी 11 नोव्हेंबर रोजी सादर करणे.
  • 14 नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी विहित नमुन्यात प्रसिद्ध करणे
  • 20 नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण हरकती व सूचना मागविण्याची अंतिम तारीख. अंतिम आरक्षण विहित नमुन्यात 28 नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे.

महिलांसाठी 50 टक्के जागा

मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांमध्ये अनु. जातीसाठी 15 जागा, अनु. जमातीसाठी 2 जागा आणि इतर मागासवर्गीयांसाठी 61 जागा आरक्षित असणार आहेत. एकूण 227 जागांपैकी 50 टक्के म्हणजेच 114 जागा या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार! ‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!
‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार’’ हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण उद्योगविश्वासाठी प्रेरणादायी टप्पा आहे.
मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर द्या : खासदार श्रीरंग बारणे 
नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर : महापौर रवि लांडगे
पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप
Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स