अभिनेते सयाजी शिंदेंची तब्येत बिघडली, ह्रदयावर शस्त्रक्रिया; डॉक्टरांनी दिली अपडेट
मराठीसह हिंदी आणि दक्षिणेकडील चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते सयाजी शिंदे यांची तब्येत बिघडली आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सातारा येथे त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया पार पडली. त्यांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
गुरुवारी (11 एप्रिल) अचानक छातीत दुखू लागल्याने सयाजी शिंदे यांना साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया पार पडली. त्यांची तब्येत स्थिर आहे. त्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहे.
दरम्यान, सयाजी शिंदे यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सोमनाथ साबळे यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली. सयाजी शिंदे यांना गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे रुटीन म्हणून त्यांनी काही तपासण्या करुन घेतल्या होत्या. दरम्यान ECG मध्ये काही मायनर चेंजेस सापडले. त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल थोडी कमी असल्याचे जाणवले, त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List