लोक मला नोट पण देतात अन् वोट पण!

लोक मला नोट पण देतात अन् वोट पण!

प्रचारासाठी निधीची आवश्यकता आहे. मात्र मी निवडणूक लढवावी अशी इच्छा असणारे माझे हितचिंतक मला मतदान तर करणार आहेतच, पण त्याचबरोबर मला आर्थिक पाठिंबाही देत आहेत, असे म्हणत खिशातून 500 आणि 100 रुपयांची नोट काढत लोक मला नोट पण देतात अन् वोटही देतात, अशी मिश्कील प्रतिक्रिया महाआघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी प्रचारादरम्यान दिली.

महाआघाडीचे उमेदवार असलेले नीलेश लंके नगर दक्षिणमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी काढलेल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेलाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान बोलताना मला सर्वसामान्यांचे भरपूर प्रेम मिळत आहे, असे नीलेश लंके यांनी सांगितले. त्यांनी खिशातून 500 आणि 100 रुपयांची नोट काढली. एका लहान मुलीने तिच्या खाऊसाठी जमा केलेले 100 रुपये दिले तर शेतात काम करणाऱया महिलेने तिची स्वकष्टाची कमाई 500 रुपये निवडणुकीसाठी मदत म्हणून दिल्याचे सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;