Lok Sabha Election 2024 : अजित पवार बारामतीचे अरुण गवळी
रामतीमध्ये अजित पवारांकडून मतदारांना धमकावण्याचे काम सुरू आहे. फोन करून दमदाटी केली जाते, बदली करून टाकतात. अरुण गवळी जसे निवडणुकीला करत होता. तसे अजित पवार बारामतीचे अरुण गवळी झाले आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आव्हाड यांनी केला.
बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातील राजकीय लढत होणार आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळेंच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मात्र अजित पवारांकडून बारामतीकरांना दमदाटी करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा आरोप केला.
बारामतीची ओळख ही शरद पवारांमुळे आहे. बिल क्लिंटन बारामतीत अजित पवारांमुळे आले नव्हते, नरेंद्र मोदी हेही अजित पवारांमुळे बारामतीत आले नव्हते, ते शरद पवारांमुळेच आले होते. चाललेय? मी संबंधितांचे फोन बघितल्यावर मला वाईट वाटले. ज्यांच्यासाठी मी जिवाचे रान केले त्यांच्याकडून इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण केले जात असेल असे वाटले नव्हते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List