विखे-पाटील साखर कारखान्यास हरित लवादाचा दणका, स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना 60 लाखांची भरपाई

विखे-पाटील साखर कारखान्यास हरित लवादाचा दणका, स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना 60 लाखांची भरपाई

पद्मश्री डॉ. विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याविरोधात कुशाबापू रंगनाथ पवार व दादासाहेब कुशाबापू पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दाखल शपथपत्राची दखल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पश्चिम विभागीय खंडपीठ पुणे यांनी घेतली आहे. याप्रकरणी शपथपत्र दाखल करताना कारखान्यात झालेल्या स्फोटात मयत कामगारांच्या वारसाला तीन महिन्यांत 60 लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश विखे कारखान्याला दिले आहेत.

कुशाबापू रंगनाथ पवार व दादासाहेब कुशबापू पवार यांच्या शेतात डॉ. विखे-पाटील साखर कारखान्याने अवैधपणे टाकलेल्या स्पेंट वॉशमुळे डाळिंब बागेला नुकसान झाले होते. याबाबत पवार यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर नेमलेल्या कमिटीची कार्यवाही असंतुष्ट करणारी होती. त्यामुळे पवार यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पश्चिम विभागीय खंडपीठ पुणे यांच्याकडे याचिका दाखल केली होती. याबाबत 8 नोव्हेंबर 2017 रोजी न्यायाधिकरण यांनी केंद्र आणि राज्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, शपथपत्रावर अंतिम निकाल देताना प्रिन्सिपल बेंचने मयत तीन कामगारांच्या वारसांना 60 लाख रुपये व जखमी कामगारांना प्रत्येकी 2.5 लाख ते 5 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.

स्फोटावेळी विखे पिता-पुत्र मनोरंजन कार्यक्रमात होते दंग – पवार

ज्यादिवशी कारखान्यात टाकीचा स्फोट झाला होता, त्यावेळी कामगारांचे मृतदेह जळत होते आणि कारखान्याचे चेअरमन राधाकृष्ण विखे व सुजय विखे हे शिर्डीमध्ये सोनाली कुलकर्णीच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात व्यस्त होते, असे पवार यांनी सांगितले. या स्फोटानंतर पवार यांनी पाठपुरावा केल्यामुळे राहता न्यायालयात कारखान्याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;