नगरमधील धरणांमध्ये केवळ 27 टक्के पाणीसाठी

नगरमधील धरणांमध्ये केवळ 27 टक्के पाणीसाठी

नगरजिह्यात गतवर्षी झालेल्या अपुऱया पावसाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. सध्या जिह्यातील धरणात एकूण साठवण क्षमतेच्या केवळ 27 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातही उत्तर नगर जिह्यात पाणी उपलब्ध असून, दक्षिण नगर जिह्यात दुष्काळाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. भंडारदरा, निळवंडे धरणाचे पोट खपाटीला गेले आहे.

राज्यात क्षेत्रफळाने मोठा असलेल्या नगर जिह्यात मुळा, भंडारदरा, निळवंडे या तीन मोठय़ा धरणांसह मुसळवाडी, टाकळीभान येथील मध्यम प्रकल्प आहेत. आढळा, घोड, मांडओहळ, घाटशीळ पारगाव, सीना, खैरी, विसापूर ही धरणे दक्षिण नगर जिह्यात आहेत. उत्तर भागाच्या तुलनेने दक्षिणेत प्रकल्पाची संख्या अधिक आहे. मात्र, उत्तरेतील मोठय़ा धरणांमुळे सत्तर टक्के पाणीसाठा उत्तर भागात होतो.

गेल्यावर्षी पावसाळ्यात नगर जिह्यात पुरेसा पाऊस झाला नाही. भंडारदरा, निळवंडे धरणे भरली. मात्र, मुळा भरले नाही. शिवाय दक्षिणेतील बहुतांश मध्यम, लघु प्रकल्प भरले नाही. त्याचा परिणाम पाणीसाठय़ावर झाला. भंडारदरा, निळवंडे, मुळाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱयांना शेतीसाठी पाण्याचा लाभ मिळाला. मात्र, उत्तरेत यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. निळवंडे धरणातून यंदा पाणी सोडल्यामुळे धरणात केवळ 11 टक्के म्हणजे एक टीएमसी पाणी आहे. गेल्या वर्षी या धरणात पावणेचार टीएमसी म्हणजे 44 टक्के पाणीसाठा होता.

भंडारदरा धरणातही सध्या केवळ साडेचार टीएमसी म्हणजे 44 टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी या धरणात साडेआठ टीएमसी म्हणजे 88 टक्के पाणी होते. मुळा धरणात सध्या 12 टीएमसी पाणी असून, पावणेआठ टीएमसी उपयुक्त पाणी आहे. उपयुक्त उपलब्ध पाण्याची टक्केवारी 34 टक्के आहे. गेल्या वर्षी ही टक्केवारी 56 टक्के होती. घोड धरणात एक टीएमसी पाणी आहे.

सीना धरणात मागील वर्षी पावणेदोन टीएमसी पाणी होते. यंदा अर्धा टीएमसी पाणी आहे. मांडओहळ, घाटशीळ, पारगाव मध्यम प्रकल्पात पाणीच नाही. आढळा, घोड, खैरी, मुसळवाडी, टाकळीभान धरणात गतवर्षीपेक्षा यंदा अल्प पाणीसाठा आहे. उत्तरेत भंडारदरा, निळवंडे धरणाचे पोट खपाटीला गेले आहे. मात्र, त्याहीपेक्षा दक्षिण भागात स्थिती गंभीर आहे. धरण, मध्यम, लघु प्रकल्पांसह गावतलाव, पाझर तलाव कोरडे पडलेले असल्याने टंचाईचा प्रश्न वरचेवर गंभीर होत असून, अजून तीन महिन्यांचा कालावधी जायचा असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.

नगर जिह्यातील स्थिती

z धरणांतील साठवण क्षमता 57 टीएमसी

z उपयुक्त एकूण साठवण क्षमता 50 टीएमसी

z एकूण उपलब्ध पाणीसाठा 22 टीएमसी

z उपयुक्त उपलब्ध पाणीसाठा 15 टीएमसी

z गतवर्षीचा एप्रिलमधील साठा 34 टीएमसी

z गतवर्षीचा एप्रिलमधील उपयुक्त पाणीसाठा 28 टीएमसी

खंडित विजेमुळे नगरकरांच्या पाणीपुरवठय़ात खंड

नगर ः शहरात तापमान मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे किमान दिवसाआड तरी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत असते. उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढतो. महावितरणकडून मात्र शहर पाणीपुरवठा योजनेवरील पंपिंग स्टेशनचा वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. मार्च महिन्यात तब्बल 18 वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना वेळेत पाणी मिळू शकले नाही. याबाबत आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी महावितरणचे येथील अधीक्षक अभियंता यांना पत्र पाठवून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणी वितरणात येणाऱया अडचणी विशद केल्या आहे. पाणी योजनेचा काही मिनिट जरी वीजपुरवठा खंडित झाला तरी मुळानगर, विळद व नागापूर येथील कार्यरत पंपिंग स्टेशन येथून पाणी उपसा सुरळीत होण्यास दोन ते तीन तासांचा अवधी लागतो. यामुळे अनियमित पाणी उपसा होऊन शहरातील वितरणासाठीच्या टाक्या वेळेत भरता येत नाहीत. पर्यायाने शहरात नियमित पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;