महादेव जानकरांच्या कुटुंबात मतभेद; पुतण्याचा माढा मतदारसंघासाठी आग्रह
लोकसभा निवडणूक लढण्यावरून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर कुटुंबात मतभेद निर्माण झाले आहेत. पुतण्या स्वरूप जानकर याचा माढा मतदारसंघातून काका महादेव जानकर यांनी लढण्याचा आग्रह होता; मात्र त्यांनी परभणी मतदारसंघाची निवड केल्याने ते नाराज झाले आहेत.
माढा मतदारसंघात विजय मिळण्याची शक्यता असताना महादेव जानकर यांनी परभणीची निवड केली. त्यावरून जानकर कुटुंबात टोकाचे मतभेद झाले आहेत. भाजपच्या दबावापुढे झुकत त्यांनी महायुतीकडून परभणीची उमेदवारी स्वीकारल्याचे स्वरूप जानकर यांचे म्हणणे आहे.
सोयीचे राजकारण करणाऱया भाजपला धडा शिकविण्यासाठी स्वरूप यांनी माढय़ातून महायुतीच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 14 एप्रिल रोजी ते कोणत्या पक्षाकडून लढणार हे जाहीर करणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List