दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणातील आरोपींच्या अटकेचा मार्ग मोकळा; शकुंतला कुटेंसह परिवाराचा जामीन फेटाळला

दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणातील आरोपींच्या अटकेचा मार्ग मोकळा; शकुंतला कुटेंसह परिवाराचा जामीन फेटाळला

दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्या पत्नी शकुंतला कुटे यांच्यासह मुले आणि सुनांचा जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा न्यायालयापाठोपाठ आता मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने फेटाळला आहे. त्यामुळे शकुंतला कुटेसह अन्य आरोपींच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

संगमनेरच्या प्रतिष्ठत दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील चेअरमन भाऊसाहेब कुटेसह 17 आरोपींनी 81 कोटी रुपयांचा केलेला अपहार समोर आला आहे. मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटेने कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या मदतीने हा आर्थिक घोटाळा केल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे. मुख्य आरोपी असलेला कुटे गुन्हा दाखल झाल्यापासून कुटुंबीयांसह फरार असून, त्याच्यासह कुटुंबातील सदस्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला होता.

अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटेचा अपवाद वगळता कुटुंबातील अन्य सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती. गुरुवारी (दि. 4) या संदर्भात निर्णय झाला असून, न्यायमूर्ती एन. बी. सूर्यवंशी यांनी जामीन अर्ज फेटाळला आहे. आर्थिक गुह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेता, आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची तपासकामी चौकशी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

कुटे याची पत्नी शकुंतला व विमल भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, दादासाहेब भाऊसाहेब कुटे व सोनाली दादासाहेब कुटे यांचा समावेश होता. गेल्या काही महिन्यांपासून या जामीन अर्जावर निर्णय प्रलंबित होता. कुटे कुटुंबीयांच्या जामीन अर्जावरील निर्णयाकडे ठेवीदार, जाणकार आणि याचा तपास करणाऱया आर्थिक गुन्हे शाखेचे लक्ष लागले होते. खंडपीठाचा निर्णय आल्याने आता गुन्हे शाखेचे अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या भाऊसाहेब कुटेसह त्याच्या कुटुंबीयांना अटक करून ठेवीदारांना दिलासा देणार का, असा प्रश्न आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;