शासकीय ठेकेदारावर हल्ला; नऊ जणांवर गुन्हा

शासकीय ठेकेदारावर हल्ला; नऊ जणांवर गुन्हा

शहरातील संजयनगरमधील रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत महापालिकेत अर्ज दिल्याच्या कारणावरून शासकीय ठेकेदारावर नऊजणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. मनपा अधिकाऱयांसमोरच संशयितांनी ठेकेदारावर दगडाने हल्ला केला. हल्लेखोर संशयितांमध्ये भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱयाचे नाव असून त्यानेच चिथावणी दिल्याचे समोर आले आहे.

ठेकेदार प्रमोद शरद काळे (इंदिरा कॉलनी, संजयनगर) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भाजपाचा पदाधिकारी दीपक रामण्णा माने, दत्ता सरगर, सविता सरगर, पम्माबाई दाजी सरगर, प्रतिभा दीपक माने, गोविंद सरगर, दाजी सरगर आणि स्वाती सरगर (सर्व रा. संजयनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद काळे यांनी इंदिरा कॉलनीमधील तीस फुटी रस्त्यावरील अतिक्रमण काढून घेण्यासाठी मनपात अर्ज केला होता.

याबाबत आज दुपारी महापालिका नगररचनाचे अधिकारी मगदूम आणि अतिक्रमण विभागाचे घोरपडे हे दोघे पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी प्रमोद काळे यांच्यावर हल्ला करण्यात आला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;