मृत व्यक्तीच्या नावाने दिली नवीन शिधापत्रिका, पारनेर तहसील कार्यालयात सावळा गोंधळ

मृत व्यक्तीच्या नावाने दिली नवीन शिधापत्रिका, पारनेर तहसील कार्यालयात सावळा गोंधळ

नागरिकांना शिधापत्रिका काढण्यासाठी पारनेर तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. अनेक हेलपाटे मारूनही शिधापत्रिका मिळेल, याची शाश्वती नाही. मात्र, दुसरीकडे कुटुंबातील मृत व्यक्तीच्या नावाने नवीन शिधापत्रिका देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे पारनेर तहसील कार्यालयातील सावळा गोंधळ चव्हाटय़ावर आला आहे.

पारनेर तालुक्यात महसूल विभागाकडून जनतेला लागणारी विविध कागदपत्रे देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ योजनेअंतर्गत गावागावांत शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांत अनेकांनी शिधापत्रिका, आधार कार्ड तसेच इतरही दैनंदिन गरजेची कागदपत्रे मिळावीत, यासाठी अर्ज केले होते. त्यातील अनेकांना अद्यापि शिधापत्रिका मिळालेल्या नाहीत. मात्र, एका मृत व्यक्तीच्या नावाने त्याच्या कुटुंबीयाला शिधापत्रिका देण्यात आली आहे. या कुटुंबातील सदस्यांनी संबंधित मृत व्यक्तीचा मृत्यूचा दाखलाही पुरवठा विभागास दिला होता. मात्र, तरीही पुरवठा विभागाने शिधापत्रिका मृत व्यक्तीच्या नावाने तयार केल्याने कुटुंबातील सदस्यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला.

आठशे कुटुंबे शिधापत्रिकेच्या प्रतीक्षेत

z पारनेर तालुक्यातील किमान सातशे ते आठशे कुटुंबे शिधापत्रिका मिळण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. शिधापत्रिका मिळाव्यात यासाठी मागील अनेक दिवसांपासून अनेक कुटुंबे तहसील कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. मात्र, अधिकारी याकडे मात्र कानाडोळा करत आहेत.

कागदपत्रे तपासणीकडे दुर्लक्ष

z ज्या मृत व्यक्तीच्या नावाने शिधापत्रिका दिली गेली, त्या व्यक्तीचे 2022 मध्ये निधन झाले आहे. शिधापत्रिका देताना त्यावर 2023 असा उल्लेख आहे. त्यावर तहसीलदारांची सही आहे. याचा अर्थ शिधापत्रिका देताना कागदपत्रांची तपासणी केली नसल्याचे उघड होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;