आसरे कालव्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू

आसरे कालव्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू

धोम धरणाच्या आसरे बोगदा कालव्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू झाला. वाई तालुक्यातील आंबेदरा (आसरे) येथे ही घटना घडली. उत्तम सहदेव ढवळे (वय 45) व अभिजित उत्तम ढवळे (वय 13) अशी मृत पिता-पुत्राची नावे आहेत.

धोम धरणातून भोर, खंडाळा, फलटण तालुक्याला बलकवडी धरणाच्या आसरे गावाजवळच्या बोगद्यातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येते. सध्या कालवा बंद आहे. त्यामुळे येथे गेट टाकलेले आहे. त्यामुळे येथे पाणी साठलेले असते. उत्तम ढवळे आणि त्यांचा मुलगा अभिजित हे दोघे आज दुपारी कालव्याच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. माहिती मिळताच त्यांचा शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाहीत. यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च ऍण्ड रेस्क्यू टीम व वाई आपदा ट्रेकर्स टीमच्या सुनील भाटिया यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी पाण्यात शोधमोहीम राबविली असता, दोघांचेही मृतदेह सायंकाळी पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. या शोधमोहिमेतील सदस्य आशुतोष शिंदे (रा. वाई) यांच्या डोक्याला बोगद्यातील लोखंडी बार लागून ते जखमी झाले. त्यांच्यावर वाई ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.

उत्तम ढवळे हे शेतकरी असून, त्यांचा चिकनचा व्यवसाय होता. तसेच ते पट्टीचे पोहणारेही होते. त्यांच्यामागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. या शोधमोहिमेत सुनील भाटिया, अमित कोळी, सचिन डोईफोडे, सौरव साळेकर, सौरभ गोळे आणि महेश बिरामने, अजित जाधव, आशीष बिरामने, ऋषिकेश जाधव, आशितोष शिंदे यांनी सहभाग घेतला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;