संगमनेरमध्ये गांजा, हेरॉईन जप्त

संगमनेरमध्ये गांजा, हेरॉईन जप्त

संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत असणा ऱ्या शिवाजीनगर येथे छापा टाकून नगर गुन्हे शाखा आणि संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने गांजा आणि गर्द (हेरॉईन) विक्री करणाऱ्या एकाला अटक केली आहे. नुकतीच पुणे पोलिसांनी संगमनेरमध्ये कारवाई करीत बनावट ताडी तयार करण्याचे लाखो रुपयांचे केमिकल पकडले होते. त्यानंतर लगेचच अमली पदार्थांची ही दुसरी कारवाई संगमनेरमध्ये झाली आहे. सातत्याने होणा ऱ्या कारवायांमुळे नगर जिह्यात अवैध धंद्यांचे प्रमुख केंद्र संगमनेर झाल्याचे दिसून येत आहे. अंबादास शांताराम शिंदे (रा. जैन सर्कल, शिवाजीनगर, ता. संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 5 लाख 17 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या छाप्यामध्ये पोलिसांनी 4 किलो 498 ग्रॅम गांजा आणि 36 ग्रॅम गर्द (हेरॉईन) जप्त केले आहे.

संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत राहणारा अंबादास शिंदे अमली पदार्थ विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यांनी संगमनेर शहर पोलिसांशी संपर्क करून शहर आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. संशयिताच्या घराची झडती घेतली असता एका गोणीत गांजा बिया, बोंडे, काडय़ा, पाने संलग्न असलेला पाला मिळून आला. तसेच त्याच्या पॅन्टच्या खिशात प्लॅस्टिक पिशवीत विटकरी रंगाची पावडर (गर्द) मिळून आली. आरोपी शिंदे विरुद्ध संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सर्व अवैध धंद्यांचे केंद्र संगमनेर

संगमनेर शहर आणि तालुक्यात सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याचे वारंवार उघड होत आहे. अमली पदार्थ गांजा, गर्द याचबरोबर केमिकलद्वारे बनावट ताडी बनवणे, हे तर उघड झाले आहेच. परंतु, शहर आणि ग्रामीण भागात वाळू तस्करी, कत्तलखाने, गोवंश हत्या, गुटखा विक्री, मटका, जुगार असे अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याचे आढळून आले आहे. संपूर्ण नगर जिह्यात संगमनेर तालुका अवैध धंद्यांचे केंद्र बनला असल्याची चर्चा आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;