नगर रेल्वे स्थानकाचा कारभार पुणे विभागातून

नगर रेल्वे स्थानकाचा कारभार पुणे विभागातून

नगर रेल्वेस्थानक आजपासून (1 एप्रिल) पुणे विभागाशी जोडण्यात आले असून, त्याप्रमाणे कारभार सुरू करण्यात आला आहे. त्याबाबतच्या फलकाचे अनावरण नगर रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आले. दरम्यान, यामुळे वेळ आणि पैसा वाचणार असून, नगर-पुणे कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे, असे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अशोकराव कानडे यांनी सांगितले.

नगर रेल्वे स्थानक आजपासून पुणे विभागाशी जोडण्यात आले. त्याबाबतच्या फलकाचे अनावरण नगर रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आले. याप्रसंगी रेल्वे स्टेशनचे प्रबंधक एम. पी. तोमर, रेल्वे सल्लागार समितीचे हरजितसिंग वधवा, अशोकराव कानडे, विलास महाजन, अनिल सबलोक, बाळासाहेब गायकवाड, कविता तागडे, सुहास पाथरकर, संदेश रपारिया, सुधीर महाजन, प्रमोद वारे आदी उपस्थित होते.

नगरचे रेल्वेस्थानक हे ऐतिहासिक आहे. सर्वांत जुने असलेले हे स्थानक 1878 साली सुरू करण्यात आले होते. त्यानंतर कालांतराने रेल्वेस्थानक सोलापूर विभागाशी जोडण्यात आले. मात्र, नगर ते सोलापूर हे आठ तासांचे अंतर असल्याने दळणवळण, प्रशासकीय कामकाज, रेल्वे संदर्भातील काम करणे अडचणीचे ठरत होते. त्यामुळे दिव्यांग, ग्रुप बुकिंग, पासेस या कामासाठी प्रवाशांना सोलापूर येथे जावे लागत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत प्रवासी संघटनेच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करून नगरचे रेल्वे स्थानक पुणे विभागाशी जोडण्यात यावे अशी मागणी केली जात होती. आज ती पूर्ण झाली असून, यामुळे वेळ आणि पैसा हे दोन्ही वाचणारच आहे. त्याचबरोबर नगर-पुणे कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल, असे अशोक कानडे यांनी सांगितले.

हरजितसिंग वधवा म्हणाले, नगर रेल्वे स्थानक पुणे विभागात आल्याने सोयीचे झाले आहे. त्याचबरोबरच नगर-पुणे लोकल किंवा इंटरसिटी रेल्वे सुरू होण्याच्या मागणीला नक्कीच गती मिळणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;