खेकडाबहाद्दर मंत्र्याचा ऍम्ब्युलन्स खरेदीत साडेसहा हजार कोटींचा महाघोटाळा, रोहित पवार यांचा गौप्यस्फोट

खेकडाबहाद्दर मंत्र्याचा ऍम्ब्युलन्स खरेदीत साडेसहा हजार कोटींचा महाघोटाळा, रोहित पवार यांचा गौप्यस्फोट

राज्याच्या आरोग्य विभागात अॅम्बुलन्स खरेदीत तब्बल साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. आरोग्य विभागाने अॅम्बुलन्स पुरवठा करणाऱया सुमित आणि बीव्हीजी कंपन्यांना नियमबाह्य टेंडर दिले. यात मिंधे गटाचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी वाढीव दराने टेंडर देऊन हा घोटाळा केला आहे. त्यामुळे आरोग्य मंत्री राज्याचा आरोग्य विभागच पोखरत आहेत, असा गौप्यस्फोट करत मंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी रोहित पवार यांनी जिवंत खेकडा दाखलवला.

रोहित पवार यांनी गेल्या आठवडय़ात दूध आणि शालेय पोषण आहारातील गैरव्यवहार पुढे आणला होता. त्यानंतर आज त्यांनी आरोग्य विभागातील घोटाळ्याचे बिंग फोडले. रोहित पवार म्हणाले, आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या दूध, भोजनात भ्रष्टाचार करणाऱया सरकारमधील मंत्र्यांनी लोकांचा जीव वाचवणाऱया अॅम्बुलन्समध्येही घोटाळा केला आहे. निवडणुकीला फंड देण्यासाठी बीव्हीजी आणि सुमित पंपनीवर मेहरबानी दाखवली जात आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हा घोटाळा केला असून राज्याला भिखारी केले आहे. या पैशांचा वापर निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न आहे. स्वच्छता कामाचे टेंडर अचानकपणे मोठय़ा प्रमाणात वाढवण्यात आले. राज्यात अत्यावश्यक सेवांसाठी दावोसमधील एक स्पॅनिश कंपनीला टेंडर दिले. हे टेंडर पिंपरी-चिंचवड येथील सुमित कंपनीने डिझाईन केले होते. या टेंडरमध्ये भागीदार करत सुमित पंपनीलाही नियमबाह्य पद्धतीने अॅम्बुलन्स पुरवण्याचे पंत्राट दिले. सुमित पंपनीला काम मिळाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध तक्रार करणाऱया बीव्हीजी कंपनीलाही नाराज न करता त्यांनाही टेंडरमध्ये सामावून घेण्यात आले. बीव्हीजी कंपनीला अनेक ठिकाणी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. असे असतानाही त्यांना या टेंडरमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. या घोटाळ्याबाबत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. तानाजी सावंत यांनी पाच दिवसांत बाजू मांडावी, सरकारनेही या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केला.

खेकडा महाराष्ट्राला पोखरतोय

खेकडय़ाने पोखरल्यामुळे धरणांना गळती लागली या तानाजी सावंत यांच्या विधानाचा आधार घेत रोहित पवार म्हणाले, तानाजी सावंत यांच्याकडून अॅम्बुलन्स खरेदी प्रकरणात साडेसहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. खेकडा वळवळ करतो, धरण पोखरतो, बिळात जाऊन बसतो, लोकांचे लक्ष कमी झाले की पुन्हा बाहेर येतो. खेकडा महाराष्ट्राला पोखरतोय, असा टोलाही लगावला.

पत्रकार परिषदेत दाखवला जिवंत खेकडा

आमदार रोहित पवार यांनी भर पत्रकार परिषदेतच जिवंत खेकडा आणला होता. दोरीने बांधलेला जिवंत खेकडा वर उंचावून दाखवताना हा खेकडा आता खूप वळवळ करतो, त्याला बांधून ठेवण्याची वेळ आली आहे, असा टोला त्यांनी तानाजी सावंत यांना लगावला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;