धोम धरणाखालील नवा पूल वाहतुकीसाठी सज्ज, वाईच्या पश्चिम भागाच्या वैभवात भर; अंतर, वेळ व इंधनाचा खर्च वाचणार

धोम धरणाखालील नवा पूल वाहतुकीसाठी सज्ज, वाईच्या पश्चिम भागाच्या वैभवात भर; अंतर, वेळ व इंधनाचा खर्च वाचणार

धोम धरणाच्या खाली व्याहळी ते धोमला जाणाऱया कृष्णा नदीच्या पात्रावरील नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, या पुलामुळे पश्चिम भागाच्या वैभवात भर पडली आहे. तसेच जोर व जांभळी खोऱयातील नागरिक व पर्यटकांना वाईहून येण्या-जाण्यासाठी लागणारे अंतर, वेळ, इंधनाच्या खर्चाची बचत होणार आहे.

कृष्णा नदीवर प्रथम धोम व नंतर बलकवडी येथे धरण बांधण्यात आले. या धरणामुळे राज्यातील हजारो एकर जमीन ओलिताखाली आली व दुष्काळी भागालाही पाणी मिळाले. मात्र, येथील भूमिपुत्रांना विस्थापित व्हावे लागले. येथील दोन्ही भागांतील या पुलाची मागणी कित्येक वर्षांपासून होती. कारण पावसाळ्यात तसेच कधीही पलीकडे जायचे म्हटले की वाई शहरातून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. जवळ जवळ 16 कि.मी. अंतर अधिक प्रवास करावा लागत होता. त्यासाठी वेळ, इंधन खर्चाचा भुर्दंड बसत होता. या नवीन पुलामुळे आता तो वाचणार आहे. त्यामुळे येथील जनतेत समाधानाचे वातावरण आहे. या पुलामुळे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिक युवक नागरिक यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

धोममधून पाणी सोडल्यानंतरही पुलावरून होणार प्रवास

– धोम धरणाखाली नवीन झालेल्या पुलासाठी 8.50 कोटी निधी खर्च झाला असून, तो पूर्णत्वास गेला आहे. पुलाची लांबी 93.94 मीटर असून, 16.477 चे दोन गाळे व 15.477चे चार गाळे, पुलाची रुंदी 10 मीटर, आरसीसी आर्च पद्धतीच्या उंच पुलाच्या दोन्ही बाजूला 50 मीटर लांबीचे पोहच रस्ते डांबरीकरण करून तयार करण्यात आले आहेत. धोम धरणातून पावसाळ्यात नदीपात्रात पाणी सोडल्यावरही पुलावरून प्रवास करता येणार आहे. स्थानिक व पर्यटकांसाठी हा पूल मोठे आकर्षण व सेल्फी पॉइंट ठरणार आहे.

या पुलामुळे जोर, जांभळी दोन्ही खोऱयांतील शेतकऱयांना शेतीमालाची ऊस वाहतूक करण्याचा व स्थानिक नागरिक पर्यटक यांना प्रवासासाठी जवळचा मार्ग उपलब्ध झाला आहे. यामुळे अंतर, वेळ, इंधनाची बचत होईल. – महेश गोंजारी, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;