माझा नेता पलटूराम निघाला, कार्यकर्त्यांचे विजय शिवतारे यांना खरमरीत पत्र

माझा नेता पलटूराम निघाला, कार्यकर्त्यांचे विजय शिवतारे यांना खरमरीत पत्र

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात फिरुन अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटणारे मिंधे गटाचे विजय शिवतारे यांचे बंड थंड झाले. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांने शिवतारे यांना खरमरीत पत्र लिहून चांगलेच सुनावले आहे. अजित पवार याला माझा आवाका कळेल म्हणणारे तुम्ही आवाका दाखविण्याच्या आधीच ‘शेपूट’ घातले. आता त्या 5 लाख 80 हजार पवारविरोधी मतदारांनी नेमके काय करायचे? असा सवाल केला आहे.

‘बापू, 13 मार्च 2024 रोजी तुम्ही बंडाची भूमिका घेऊन बारामती लोकसभेची निवडणूक ‘अपक्ष’ लढवण्याचा निर्धार केला. त्यानंतर तुम्ही खंडोबाच्या साक्षीने ‘एल्गार’ पुकारला. ‘बारामती कोणाची जाहागिरी नाही’ असे तुमची अनेक विधाने गाजली. परंतु घोडा-मैदान जवळ आले असताना तुम्ही माघार घेतली. त्यामुळे आमचीही मोठी अडचण झाली, असे पत्रात म्हटले आहे.

फटा पोस्टर निकला चूहा

‘बापू, मी तुमचा कट्टर समर्थक आहे. तुम्ही म्हणाल तसे आजपर्यंत करीत आलो आहे. पण, काल माझा नेता असा संधीसाधू, लेचापेचा निघाला, याचं फार वाईट वाटलं. तुमचा बोलविता धनी दुसराच कुणी होता. तुम्ही कुणाची स्क्रिप्ट वाचत होतात? आता तुमची वैयक्तिक भूमिका काय? तुम्ही म्हणजे ‘फटा पोस्टर निकला चूहा’ नव्हेत का? याचीही उत्तरे दिलीच पाहिजेत, असेही पत्रात म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;