महाबळेश्वर – पोहण्यासाठी गेलेल्या दोन मैत्रिणींचा बुडून मृत्यू, दोन मुलींना वाचविले

महाबळेश्वर – पोहण्यासाठी गेलेल्या दोन मैत्रिणींचा बुडून मृत्यू, दोन मुलींना वाचविले

सातवीमध्ये शिकणाऱया पाच मैत्रिणी आज एकत्र जलाशयामध्ये पोहण्यासाठी गेल्या असता, दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला, तर दोन मुलींना वाचविण्यात यश आले. महाबळेश्वर तालुक्यातील वाळणे येथे आज दुपारी ही घटना घडली. मुलींच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सोनाक्षी तानाजी कदम (वय 12), सोनाक्षी रामचंद्र सुतार (वय 12) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. तर सृष्टी सुनील नलावडे (वय 13) ही जखमी असून, तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाळणे गावातील आशासेविका शुभांगी सुनील तांबे (वय 43) यांची मुलगी हर्षदा तांबे सातवीमध्ये शिकते. सातवीचा अभ्यास करण्यासाठी तिच्या मैत्रिणी रोज त्यांच्या घरी येतात. नेहमीप्रमाणे आज दुपारी हर्षदा सुनील तांबे, आर्या दीपक नलावडे, सृष्टी सुनील नलावडे, सोनाक्षी तानाजी कदम व सोनाक्षी रामचंद्र सुतार या पाच मुली घरात अभ्यास करीत होत्या. दुपारी सर्व मैत्रिणी जलाशयावर पोहण्यासाठी गेल्या. खोलीतून मुलींचा आवाज येत नाही म्हणून आशासेविका शुभांगी तांबे यांनी डोकावून पाहिले तेव्हा मुली दिसल्या नाहीत. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, शिवसागर जलाशयाच्या दिशेने मुलींचा आरडाओरडा सुरू होता. शुभांगी तांबे तातडीने जलाशयावर गेल्या असता, चार मुली पाण्यात बुडत होत्या. तर त्यांची मुलगी हर्षदा आरडाओरडा करीत होती. यावेळी शुभांगी तांबे आणि मच्छिमार मुलांनी आर्या नलावडे आणि सृष्टी नलावडे यांना वाचविले. तर सोनाक्षी सुतार व सोनाक्षी कदम या दोघींचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच, महाबळेश्वर पोलीस आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम यांनी घटनास्थळी धाव घेतली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;